16 December 2024 12:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

विधेयकावरून एखाद्या DIG ने राजीनामा देण्याची स्थिती पहिल्यांदाच | फडणवीसांना विसर?

Devendra Fadnavis, DG Jaiswal, DIG Lakhminder Singh Jakhar

मुंबई, ३१ डिसेंबर: जयस्वाल यांच्या या प्रतिनियुक्तीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. अतिशय कार्यक्षम असे डीजी महाराष्ट्राला लाभले होते. मात्र, डीजींना कुठेही विश्वासात न घेता कारभार चालला आहे. पोलीस हा स्वतंत्र विभाग आहे, तो जरी गृहमंत्रालयाच्या अधिकारात असला तरी, त्याची स्वायत्ता आहे. सरकारने सुपरवायझर म्हणून या विभागाकडे काम केलं पाहिजे. पण, लहानातल्या लहान बदल्यांपासून ते अनेक गोष्टीत हस्तक्षेप सुरू आहे. त्यामुळेच, डीजींना हा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदाच अशी परिस्थिती आहे की, सरकारच्या कारभाराला कंटाळून एखादे डीजी प्रतिनियुक्ती घेत आहेत, हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही, असे म्हणत फडणवीस यांनी सरकारवर टीका केलीय.

दरम्यान, फडणवीसांनी सदर विषयाला अनुसरून राज्यात अशी स्थिती पहिल्यांदाच पाहायला मिळाली असल्याचं म्हटलं असलं तरी दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारने लागू केलेल्या एखाद्या विधेयकावरून देखील एका DIG अधिकाऱ्याने राजीनामा थेट केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवत एखाद्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचा प्रकार देखील देशात पहिल्यांदाच घडला आहे याचा फडणवीसांना विसर पडला असावा असंच म्हणावं लागेल.

कारण १४ डिसेंबरला आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी पंजाबचे उपमहानिरीक्षक (तुरुंग) लखमिंदरसिंग जाखड यांनी थेट पदाचा राजीनामा दिला होता. केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठविलेल्या पत्रात जाखड यांनी शेतकऱ्यांना समर्थन म्हणून पदाचा राजीनामा देत असल्याचे नमूद केले होते. हे देशातील एक दुर्मिळ उदाहरण म्हणावं लागेल की एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याने पदाचा थेट राजीनामा देत केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाचा निषेध केला होता.

 

News English Summary: On December 14, Punjab Deputy Inspector General (Prisons) Lakhminder Singh Jakhar had resigned in support of the agitation. In a letter to the Union Home Ministry, Jakhar had said that he was resigning in support of the farmers. It is a rare example in the country that such a senior official had directly resigned from the post and protested against the Central Government’s Agriculture Bill.

News English Title: Devendra Fadnavis angry over deputation DG Jaiswal fired arrows criticism government news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x