23 September 2021 2:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

Alert | सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा | हवामान खात्याकडून सतर्क राहण्याचे आवाहन

Very heavy rain alert in Konkan

मुंबई, ०७ सप्टेंबर | सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ सप्टेंबर आणि ८ सप्टेंबर रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबाबतचा इशारा मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. गणपती उत्सवासाठी कोकणात याच काळात शेकडोंच्या संख्येने चाकरमानी मुंबई आणि अन्य भागातून जाणार आहेत. त्यामुळे त्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा | हवामान खात्याकडून सतर्क राहण्याचे आवाहन – Heavy rains in Sindhudurg district, Appeal for vigilance from the weather department :

मुसळधार पावसाच्या या पूर्व सूचनेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व विभागांना निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी सुद्धा सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व विभागांनी आपल्या अधिनस्थ यंत्रणेला अतिवृष्टीची पूर्वसूचना द्यावी आणि त्याप्रमाणे आवश्यक ते नियोजन संबंधितांकडून करून घ्यावे, असे निर्देश प्रशासनाच्या वतीनं दिले आहेत.

अतिवृष्टीच्या अनुषंगानं सर्व विभागांनी समन्वयानं काम करावं, कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची माहिती त्वरित जिल्हा नियंत्रण कक्षाला –०२३६२-२२८८४७ या संपर्क क्रमांकावर उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.

देवगड तालुक्यात ७५ मि.मी. पावसाची नोंद:
जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत देवगड तालुक्यात सर्वाधिक ७५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ४६.३ मि.मी. पाऊस झाला असून १ जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी ३३५४.९८२ मि.मी. पाऊस झाला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Very heavy rain alert in Konkan.

हॅशटॅग्स

#RainUpdates(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x