15 December 2024 10:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

चंद्रकांतदादांना कोल्हापुरात धक्का | गोपाळराव पाटील यांची काँग्रेसमध्ये घरवापसी

Kolhapur, BJP leader Gopalrao Patil, joins congress, Minister Satej Patil

कोल्हापूर, ०१ मार्च: भारतीय जनता पक्षाची सत्ता गेल्यानंतर महाविकास आघाडीतील पक्षात नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे पक्षांतर सुरुच आहे. कोल्हापुरातील भारतीय जनता पक्षाच्या बडा नेत्याने काँग्रेसचे दिग्गज नेते सतेज पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गोपाळराव पाटील यांनी अवघ्या तीन वर्षात भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये घरवापसी केली. मागील काही दिवसांपासून त्यांच्या पुनरागमनाच्या चर्चा रंगल्या होत्या. (Kolhapur BJP leader Gopalrao Patil joins congress in presence of minister Satej Patil)

कोल्हापूरमध्ये भारतीय जनता पक्षाला गळती सुरुच असल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या जिल्ह्यातच गळतीला सुरुवात झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. चंदगड तालुक्यातील भाजपवासी झालेल्या गोपाळराव पाटील यांनी कार्यकर्त्यांसह पुन्हा काँग्रेसचा झेंडा हाती धरला आहे. (Gopalrao Patil, a BJP supporter from Chandgad taluka, has once again held the Congress flag with his party workers)

तत्पूर्वी तीन वर्षांपूर्वी गोपाळराव पाटील यांनी काँग्रेसला अलविदा करत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. परंतु वरिष्ठ नेत्यांनी पक्ष प्रवेशाच्या वेळी दिलेला शब्द पाळला नसल्याची नाराजी गोपाळरावांनी व्यक्त केली होती. ते मागील काही दिवसांपासून नाराज होते.

 

News English Summary: After the Bharatiya Janata Party came to power, the party leaders and activists in the Mahavikas Aghadi party continued to change. A senior BJP leader from Kolhapur joined the Congress in the presence of veteran Congress leader Satej Patil. In just three years, Gopalrao Patil defeated the Bharatiya Janata Party and returned home to the Congress. The last few days have been buzzing with talk of his return.

News English Title: Kolhapur BJP leader Gopalrao Patil joins congress in presence of minister Satej Patil news updates.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x