22 January 2022 5:29 AM
अँप डाउनलोड

राजकीय आशीर्वाद? | फडणवीसांच्या पुतण्याने आरोग्य कर्मचारी म्हणून कोरोना लस घेतली | RTI मध्ये सत्य उघड

Tanmay Fadnavis

नागपूर, 10 जून | राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या 25 वर्षीय पुतण्याने वयाचे निकष पूर्ण होण्याआधीच कोरोना लस घेतल्यामुळे समाज माध्यमांवर प्रश्नांचा जोरदार मारा करण्यात आला होता. 1 मे पासून 18 वर्षावरील नागरिकांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात झाली. परंतु, त्यापूर्वीच पंचविशीतील तरुणाला लस कशी मिळाली? असा सवाल विरोधकांकडून त्यावेळी विचारण्यात येत होता. या मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीसांवरही जोरदार टीका झाली. दरम्यान, फडणविसांसोबत पुतण्याचं नातं असलेल्या तन्मनने आरोग्य कर्मचारी असल्याचं सांगत कोरोनाची लस घेतल्याचं माहिती अधिकारातून उघड झालं आहे.

तन्मय फडणवीस याने आरोग्य कर्मचारी असल्याचं भासवून कोरोना प्रतिबंधक लस घेतली. त्याने लसीकरणापूर्वी आपण आरोग्य कर्मचारी असल्याची नोंदणी केली, अशी माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे. बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर इथले माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी याबाबत माहिती मागवली होती. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार तन्मय याने आरोग्य कर्मचारी असल्याचं भासवत कोरोना लस टोचून घेतली आहे. प्रत्यक्षात तन्मय फडणवीस याच्या ट्विटर फ्रोफाईलवर अभिनेता असा उल्लेख आहे.

त्यावेळी लस घेतल्याचा फोटो देखील त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. मात्र, यावरून वाद सुरू झाल्यानंतर हा फोटो डिलीट करण्यात आला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यावर प्रतिक्रिया दिली होती. “तन्मय फडणवीस माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याला कोणत्या निकषानुसार लसीचा डोस मिळाला याची मला कल्पना नाही. जर हे नियमानुसार झालं असेल तर त्याच्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. पण जर नियमावलीचं उल्लंघन झालं तर हे अगदी अयोग्य आहे”, असं ते म्हणाले होते.

 

News English Summary: Devendra Fadnavis was also heavily criticized. Meanwhile, the RTI has revealed that Tanman, who has a nephew relationship with Fadnavis, took the corona vaccine claiming to be a health worker. Tanmay Fadnavis pretended to be a health worker and took the corona vaccine.

News English Title: Devendra Fadnavis’s nephew Tanmay Fadnavis vaccinated Corona pretending to be a health worker news updates.

हॅशटॅग्स

#DevendraFadnavis(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x