मला मारलं किंवा मी आत्महत्या केली, तर तुम्ही वाचणार नाही - हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद, ३० मे : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर आता हर्षवर्धन जाधव यांनी आपले सासरे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्यावरच गंभीर आरोप केला आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी एक व्हिडिओ युट्युबवर अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये हर्षवर्धन जाधव यांनी कुटुंबातील कलह चव्हाट्यावर आणला आहे. जाधव यांनी उघडउघडपणे आपले सासरे रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.
या व्हिडिओत हर्षवर्धन जाधव यांनी दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. ते म्हणालेत की, ‘तुम्हाला वाटतं हा फार फडफड करतो, कुठेही धरून याला कापून टाकू पण मी तुमचे छक्के-पंजे असणारे व्हिडिओ काढले आहेत आणि अनेक वरिष्ठ वकिलांना पाठवले आहेत. मला तुम्ही मारलं किंवा मी आत्महत्या केली, तर तुम्ही वाचणार नाही, इतकं लक्षात ठेवा’, असा धमकीवजा इशाराच दानवे यांनी जाधव यांनी दिला असून या व्हिडिओने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजण्याची शक्यता आहे.
‘माझे वडील आयएएस अधिकारी होते, तुम्ही चौथी पास आहात, तरी जास्त पैसे कमावलेत. पैसे कमवणे माझे संस्कार नाहीत. मला धमकी देऊन तुम्ही २ महिने दिल्लीला ठेवलं. तुमच्या मुलीला तुम्ही काही बोलला नाहीत, फक्त मला धमक्या दिल्यात. माझ्यामागे कोणी नसल्याचं तुम्ही म्हणालात, पण तरीही विधानसभा निवडणुकीत मला मतं कोणी दिली? तुमच्यात हिंमत असेल, तर मोदींचा चेहरा बाजूला करा, भाजप बाजूला करा आणि लढून दाखवा, पक्षश्रेष्ठींचे पाय चोळल्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही,’ अशी घणाघाती टीका जाधव यांनी केली.
‘तुम्हाला वाटतं हा फार फडफड करतो, कुठेही धरून याला कापून टाकू, पण मी तुमचे छक्के-पंजे असणारे व्हिडिओ काढले आहेत आणि वकिलांना पाठवले आहेत. मला तुम्ही मारलंत किंवा मी आत्महत्या केली, तर तुम्ही वाचणार नाही,’ असा गंभीर आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. तुम्हाला तुमच्या मुलीला आमदार करायचं असेल, तर करा, मदत मी करीन, असंही जाधव म्हणाले. तुम्ही मला मदत केली नाही, उलट माझ्या कार्यकर्त्यांकडून १० टक्के घेतल्याचा आरोपही त्यांनी दानवेंवर केला.
News English Summary: Former Kannada MLA Harshvardhan Jadhav had announced his decision to retire from politics. Since then, Harshvardhan Jadhav has leveled serious allegations against his father-in-law and senior BJP leader Raosaheb Danve. Former MLA Harshvardhan Jadhav has uploaded a video on YouTube.
News English Title: If I commit suicide your videos will come out Harshwardhan Jadhav threat to BJP Raosaheb Danve News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Stocks in Focus | धमाकेदार रिटर्न्स, 5 दिवसात 67 टक्के परतावा, गुंतवणूकदारांना मजबूत फायदा, हे स्टॉक्स खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी
-
Credit card | तुम्ही जर क्रेडिट कार्ड वापरत असाल तर या 10 गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे, अन्यथा खूप नुकसान होईल
-
Bihar Political Crisis | बिहारमध्ये 2 दिवसांत खेला होबे?, भाजप प्रणित एनडीएमध्ये फूट पडणार, राजद भाजपशी आघाडी तोडणार?
-
Outstanding Tax Demand | रिटर्न प्रोसेसिंगनंतर येतेय 'आऊटस्टँडिंग टॅक्स डिमांड?, घाबरून जाण्याऐवजी या स्टेप्स फॉलो करा
-
Investment Scheme | रोज फक्त 200 रुपये बचत करा, तुम्हाला 2 कोटी 11 लाख रुपयांचा परतावा मिळेल
-
Bihar Politics | नितीश-तेजस्वी एकत्र येणार, युती तोडण्याची घोषणा होऊ शकते, मोदींचा २०२४ मधील मार्ग खडतर
-
संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार अजुन काही दिवस केवळ शिंदे-फडणवीसांचं 'अति सूक्ष्म कॅबिनेट मंत्रिमंडळच' सांभाळणार?, कारण काय?
-
Investment Tips | तुमच्या गुंतवणुकीत उत्तम असेट्स मॅनेजरची निवड कशी करावी?, फायद्याची माहिती जाणून घ्या
-
Modi Govt Failure | खाजगी आरोग्य विमा कंपन्या नफ्यात, तर सरकारी आरोग्य विमा कंपन्यांना 5 वर्षांत 26,364 कोटीचा तोटा
-
WhatsApp Updates | व्हॉट्सॲपमध्ये होणार मोठे बदल, या मेसेजेसचे स्क्रीनशॉट्स काढू शकणार नाही