13 December 2024 10:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
x

माझे वडील IAS अधिकारी होते, तुम्ही चौथी पास आहात, दानवेंची लायकी काढली

Harshwardhan Jadhav, Raosaheb Danve

औरंगाबाद, ३० मे : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर आता हर्षवर्धन जाधव यांनी आपले सासरे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्यावरच गंभीर आरोप केला आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी एक व्हिडिओ युट्युबवर अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये हर्षवर्धन जाधव यांनी कुटुंबातील कलह चव्हाट्यावर आणला आहे. जाधव यांनी उघडउघडपणे आपले सासरे रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

या व्हिडिओत हर्षवर्धन जाधव यांनी दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. ते म्हणालेत की, ‘तुम्हाला वाटतं हा फार फडफड करतो, कुठेही धरून याला कापून टाकू पण मी तुमचे छक्के-पंजे असणारे व्हिडिओ काढले आहेत आणि अनेक वरिष्ठ वकिलांना पाठवले आहेत. मला तुम्ही मारलं किंवा मी आत्महत्या केली, तर तुम्ही वाचणार नाही, इतकं लक्षात ठेवा’, असा धमकीवजा इशाराच दानवे यांनी जाधव यांनी दिला असून या व्हिडिओने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजण्याची शक्यता आहे.

‘माझे वडील आयएएस अधिकारी होते, तुम्ही चौथी पास आहात, तरी जास्त पैसे कमावलेत. पैसे कमवणे माझे संस्कार नाहीत. मला धमकी देऊन तुम्ही २ महिने दिल्लीला ठेवलं. तुमच्या मुलीला तुम्ही काही बोलला नाहीत, फक्त मला धमक्या दिल्यात. माझ्यामागे कोणी नसल्याचं तुम्ही म्हणालात, पण तरीही विधानसभा निवडणुकीत मला मतं कोणी दिली? तुमच्यात हिंमत असेल, तर मोदींचा चेहरा बाजूला करा, भाजप बाजूला करा आणि लढून दाखवा, पक्षश्रेष्ठींचे पाय चोळल्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही,’ अशी घणाघाती टीका जाधव यांनी केली.

 

News English Summary: My father was an IAS officer, you are a fourth pass, but you made a lot of money. Making money is not my culture. You threatened me and kept me in Delhi for 2 months. You didn’t say anything to your daughter, just threatened me

News English Title: Aurangabad Harshwardhan Jadhav critics on Raosaheb Danve News Latest updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x