28 March 2023 2:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | थेट 50 लाख रुपयांचा फायदा देणारी पोस्ट ऑफिसची योजना, फायद्यासह योजनेचा तपशील जाणून घ्या Income Tax Return | पगारदारांसाठी मोठी बातमी, गुंतवणूक न दाखवता इन्कम टॅक्समध्ये 50 हजाराची सूट मिळणार LIC Policy Surrender Value | तुमची LIC पॉलिसी सरेंडर करायचा विचार आहे? पहा नियमानुसार किती रुपये मिळतील Vodafone Idea Share Price | काय म्हणता? व्होडाफोन आयडिया कंपनी बंद होणार? कंपनीचे शेअर्स आणखी खोलात गेले, पुढे काय? TTML Share Price | टाटा ग्रूपच्या टीटीएमएल कंपनीचे शेअर्स कधी वाढणार? आतापर्यंत शेअरची कामगिरी कशी होती? सविस्तर माहिती EPF Interest Rate Hike | नोकरदारांसाठी खुशखबर! ईपीएफ व्याज दर वाढवले, आता किती फायदा मिळणार पहा Income Tax Cash Rules | बापरे! आता 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रकमेच्या खरेदीवर कागदपत्रे द्यावी लागणार
x

महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांच्याकडून राहुल गांधींची पाठराखण, ते सावरकरांबाबतच सत्य असंही म्हटलं

Tushar Gandhi

Veer Sarvarkar | स्वातंत्र्यवीर सावरकर हे ब्रिटिशांची पेंशन घेत होते. त्यांच्यासाठी काम करत होते. त्यांनीच इंग्रजांना तसं पत्र लिहिलं होतं, असा दावा करणाऱ्या राहुल गांधी यांच्याविरोधात आज संपूर्ण महाराष्ट्रात उद्रेक झाला आहे. विविध राजकीय पक्ष तसेच हिंदू संघटनांनी राहुल गांधींच्या या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

राहुल गांधी यांच्या प्रतिमेला काळं फाडणं, जोडे मारो आंदोलन तर कुठे पुतळा जाळण्याचे प्रकार घडले आहेत. मनसेतर्फे सर्वात मोठं राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आलंय. राज्यभरातील मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी शेगावच्या दिशेने निघाले आहेत. राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवून हे आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबतीत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता भाजप आक्रमक झाली आहे. पुण्यात भाजप कार्यकर्त्यांकडून काँग्रेस कार्यालायवर निषेध मोर्चा काढण्यात आला.

दरम्यान, आता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी राहुल गांधी योग्यच बोलले असं म्हटलं आहे. तुषार गांधी म्हणाले की, ‘राहुल गांधी यांनी जे सांगितलं ते सत्यच आहे. कारण विनायक दामोदर सावरकर यांनी इंग्रजांची माफी मागून नंतर त्यांच्याकडून पेन्शनही घेतलं होतं. पुढच्या काळात त्यांनी ब्रिटिशांसाठी कामही केलं होतं. त्यामुळे सत्य सांगायला जर आपण घाबरलो तर आपण त्या सत्याशी दगाबाजी करतो आहोत. असं म्हणत तुषार गांधी यांनी राहुल गांधीचं वक्तव्य योग्यच आहे असं म्हटलं आहे. तुषार गांधी हे आज राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Tushar Gandhi the grandson of Mahatma Gandhi joined to walk with Rahul Gandhi in the Bharat Jodo Yatra check details 18 November 2022.

हॅशटॅग्स

Bharat jo(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x