13 August 2022 9:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ratna Jyotish | आर्थिक तंगीत अडकलेल्यांना अर्थसंपन्न करेल हे शुभं रत्न, आर्थिक भरभराटीसाठी फायदेशीर अजब! स्वतःच भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या यामिनी जाधव, यशवंत जाधवांना सोबत घेऊन मुंबईतील भ्रष्‍टाचारी व्यवस्थेला तडीपार करणार? भाजपने जो घाबरेल त्याला घाबरवलं आणि जो विकला जाईल त्याला खरेदी केलं, तेजस्वी यादवांनी अनेकांची लायकीच काढली Mutual Fund Top Up | म्युच्युअल फंड टॉप-अपचा दुहेरी फायदा कसा घ्यावा, मजबूत नफ्यासाठी संपूर्ण माहिती जाणून घ्या Viral Video | ती चालत्या गाडीच्या खिडकीबाहेर बॅलेन्स टाकून नाचत होती, पण तिच्यासोबत असं काही धक्कादायक घडलं Horoscope Today | 13 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Small Saving Schemes | गुंतवणूकदारांना दुहेरी लाभ, या लहान बचत योजनांमध्ये पैसे गुंतवून चांगला नफा आणि टॅक्स सूट मिळवा
x

आदित्य आणि उद्धव ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट? भाजप IT सेल कार्यरत होतोय?

BJP, Aaditya and Uddhav Thackeray

मुंबई, ०७ ऑगस्ट : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपूत्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात सोशल मीडियावर एका महिलेनं आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती. या प्रकरणी सुनयना होलेविरोधात सायबर विभागाने गुन्हा दाखल केला होता. पण, या महिलेला जामीन हा भाजपच्या नेत्यांची केल्याची धक्कादायक बाबसमोर आली आहे.

राज्यात भाजपला सत्तेवरुन खाली खेचल्यानंतर ठाकरे सरकाराला कोंडीत पकडण्यासाठी भाजपचे नेते कोणतीही संधी सोडत नाही. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका होत आहे.

गेले काही दिवस ट्विटरवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर अतिशय खालच्या दर्जाची टीका टिप्पणी केली जात होती. तर उद्धव ठाकरे यांचा फोटो एडिट करून मौलवी झाल्याचे दाखवण्यात आला आहे. या पोस्टमुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होत असल्याचा आरोप अॅड. धरम मिश्रा यांनी केला होता. यानंतर प्रकरणातील महिलेला अटक झाली असून तिला जामीनावर सोडण्यात आलं आहे. सायबर विभाग ट्विटर अकाउंट मॉनिटर करत आहे आणि अकाउंटची पडताळणी करून सायबर विभागाकडून पुढील तपास करत आहे. मात्र सुनयना होले यांना जामीन मिळण्यामागे भाजपाचं कनेक्शन असल्याचे सांगण्यात येत आहे.

तजिंदर पाल बग्गा यांनी ट्विट करुन देवांग दवे यांना सुनयना होले प्रकरणात लक्ष घालण्यात सांगितले. यानंतर देवांग दवे यांनी ट्विट करुन संबंधित अधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालं आहे, अशं सांगितले. तसेच सुनयना होले यांना जामीनही मंजूर झाला असल्याचे ट्विट देवांग दवे यांनी केले आहे. त्यामुळे भाजपाच्या या दोन नेत्यांच्या ट्विटमुळे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिण्यामागे भाजपाचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे.

अलीकडे सुशांत सिंह राजपूत प्रकरणातही ठाकरे सरकारविरोधात सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल करण्यात आल्या आहे. भाजपच्या नेत्यांनी उघडपणे ठाकरे कुटुंबावर बेछुट आरोप केले होते. एवढंच नाहीतर या भाजपच्या नेत्यांनी दिनो मोर्यापासून ते सूरज पांचोली यांची नाव समोर आणली होती. पण दोघांनीही आपला या प्रकरणाशी काडीमात्र संबंध नसल्याचे सांगून दावा हाणून पडला होता.

 

News English Summary: A woman had written an offensive post on social media against state Chief Minister Uddhav Thackeray and his son Environment Minister Aditya Thackeray. The cyber department had filed a case against Sunaina Hole in this regard. However, a shocking case has come to light that this woman was granted bail by BJP leaders.

News English Title: BJP behind woman who made offensive posts about Aaditya and Uddhav Thackeray excitement over tweets News Latest Updates.

हॅशटॅग्स

#AadityaThackeray(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x