वाझे कुटुंबियांकडून हायकोर्टात हेबियस कॉर्पस दाखल | मनसुख यांच्या पत्नीला हाताशी धरून राजकीय नेत्यांनी...
मुंबई, १५ मार्च: मनसुख हिरेन प्रकरणी क्राइम ब्रांचमधून उचलबांगडी केल्यानंतर आता API सचिन वाझे यांना निलंबित करण्यात आले आहे. सचिन वाझे यांच्यासोबत काम करणाऱ्या क्राइम ब्रांचच्या एका अधिकाऱ्यासह एका हवालदाराची सुद्धा NIA कडून चौकशी केली जात आहे. त्यांना तपास संस्थेने सोमवारी चौकशीसाठी बोलावले होते. त्यामध्ये API रियाज काझी यांचीही पुन्हा चौकशी केली जात आहे.
आता सचिन वाझे यांचे बंधू सुधर्म वाझे यांनी हायकोर्टात हेबियस कॉर्पस दाखल करून वाझे यांच्या अटकेवर हरकत घेतली आहे. वाझे यांना न्यायालयात हजर करण्यात यावे आणि त्यांची सुटका करण्यात यावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमल यांना हाताशी धरून आणि त्यांचा वापर करून राजकीय क्षेत्रातील काही नेत्यांनी सचिन वाझे यांना ‘बळीचा बकरा’ केला आहे, असा आरोप याचिकेद्वारे करण्यात आला आहे. (Sachin Vaze’s brother Sudharma Vaze has filed a Habeas corpus in the High Court challenging Sachin Vaze’s arrest)
एनआयएच्या कृतीवरून हे स्पष्ट होते की ते कुहेतून काम करत आहेत. ते केवळ आपल्या भावाची प्रतिष्ठा मलिन करण्यासाठी हे करत आहेत, असा आरोप सुधर्म यांनी केला आहे. वाझे यांना चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आली. त्यांना ४१(ए) अंतर्गत नोटीस न देता तसेच एफआयआरची प्रतही देण्यात आली नाही. त्यांना अटकेचे कारणही सांगण्यात आले नाही. अशाप्रकारे एनआयएने फौजदारी दंडसंहितेचे उल्लंघन केले आहे. एनआयएने वाझे यांना अटक करण्यासाठी केलेल्या घाईवरून त्यांचा कुहेतु स्पष्ट होतो. एनआयए जाणुनबुजून कायद्याचे पालन करत नाही आहे. त्यामुळे सचिन वाझे यांच्या कायदेशीर अधिकारांचे उल्लंघन होत आहे, असेच याचिकेत म्हटले आहे. सचिन वाझे यांचा फरार होण्याचा विचार नाही. त्यांनी चौकशीसाठी एनआयएला सहकार्य केले. वाझे हे गेले १७ वर्षे मुंबई पोलीस दलात उच्च पदावर काम करत आहेत, असे याचिकेत म्हटले आहे.
विशेष म्हणजे मनसुख हिरेन यांच्या पत्नीने पत्रकार परिषदेत मनसुख यांना फोनकरून कांदिवली क्राईम ब्रांचमधून तावडे नावाची व्यक्ती बोलवायची असा दावा केला होता. मात्र त्यानंतर कांदिवली क्राईम ब्रांचमध्ये तावडे नावाची कोणतीही व्यक्ती कार्यरत नसल्याचं समोर आलं होतं. मग त्यांच्या पत्नीने हा दावा कोणत्या आधारावर केला होता असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे NIA ने याबाबत कोणतीही चौकशी केली नाही हे विशेष म्हणावे लागेल.
दरम्यान, वाझे यांनी आपल्या अटकेच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. ती स्वीकारण्यात आली असली तरीही न्यायालयाने सुनावणीची नेमकी कोणती तारीख दिली हे अद्याप समोर आलेले नाही. या संपूर्ण कारवाईला महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून केंद्र सरकारची सूड बुद्धीची कारवाई असे म्हटले आहे. अर्णब गोस्वामीला वाझेंनी अटक केली होती. त्याचा ठरवून बदला घेत महाराष्ट्र पोलिसांचा अपमान केला जात आहे असे शिवसेनेने आपल्या मुखपत्रात म्हटले आहे.
News English Summary: Sachin Vaze’s brother Sudharma Vaze has filed a Habeas corpus in the High Court challenging Sachin Vaze’s arrest. Waze should be produced in court and released, the petition said. The petition alleges that some political leaders have made Sachin Vaze a scapegoat by holding and using Mansukh Hiren’s wife Vimal.
News English Title: Sachin Vaze’s family move to Mumbai high Court against arrest by NIA news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News