10 May 2024 1:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 10 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट Spright Agro Share Price | 65 पैशाच्या शेअरची कमाल! अवघ्या 1 वर्षात 5000% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त Gold Rate Today | गुड-न्यूज! आज अक्षय्य तृतीयेच्या 1 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम, पटापट नवे दर तपासून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
x

कोरोनाची लागणं झाल्याने अधिवेशनापासून दूर असलेले अनुभवी नेते पुन्हा ऍक्टिव्ह

Devendra Fadnavis, CDR, NIA, Jayant Patil

मुंबई, १५ मार्च: सचिन वाझे प्रकरणी ठाकरे सरकारमध्ये घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्वाची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरला पार पडत आहे त्याच वेळेस मुंबईचे कायदे व्यवस्थेचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले आहेत. दोघांच्या आधी पोलीस उपायुक्त मिलिंद भारंबेनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. भारंबे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीआधी अनिल परब यांनाही भेटले.

यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील म्हणाले की, “एफआयआर दाखल झाल्यानंतर इंटरनेटवर ती माहिती मिळते. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सीडीआर असेल तर त्यांनी तपास यंत्रणेला तो सीडीआर द्यावा. NIA वाहन कुणी ठेवले त्याचा तपास करत आहे”, असं पाटील म्हणाले.

कुणी दोषी आढळलं तर त्याला योग्य ती शिक्षा मिळेल, अशी आमच्या सरकारची स्पष्ट भूमिका आहे. कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न केला जात नाही. शिवसेनेकडूनही तसा प्रयत्न केला जात नाही. गृहमंत्र्यांनी त्यांच्याकडची माहिती सभागृहात दिली होती. त्यांची तेव्हाची त्यावेळेची योग्य भूमिका होती. अधिकारी त्यात सामील असेल तर तपास यंत्रणा कारवाई करतील. तपास यंत्रणेचा निष्कर्ष झाल्यावर निर्णय घेण्यात येईल”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास ATS करत आहे. त्यामुळे योग्यवेळी त्या त्या गोष्टी समोर येतील, असंदेखील जयंत पाटील यावेळी म्हणाले. दरम्यान, राज्य अधिवेशन काळात राष्ट्रवादीचे अनुभवी आणि महत्वाचे नेते कोरोनाची लागण झाल्याने विधिमंडळात उपस्थित राहू शकले नव्हते. त्यात जयंत पाटील आणि भुजबळांसारख्या नेत्यांचा समावेश होता. परिणामी विधिमंडळात फडणवीस वरचढ ठरले. मात्र ते नेते पुन्हा कार्यरत होऊ लागल्याने महाविकास आघाडीचा डिफेन्स पुन्हा जोरदारपणे होण्याची शक्यता आहे. त्याचा प्रत्यय जयंत पाटील यांच्यापासून येऊ लागलं आहे.

 

News English Summary: Talking to media, Jayant Patil said, After filing an FIR, the information is available on the internet. If Devendra Fadnavis has a CDR, he should give it to the investigating agency. The NIA is investigating who kept the vehicle.

News English Title: If Devendra Fadnavis has a CDR he should give it to the investigating agency said Jayant Patil news updates.

हॅशटॅग्स

#JayantPatil(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x