15 December 2024 6:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या
x

Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर

Trent Share Price

Trent Share Price | मंगळवारी टाटा समूहाचा भाग असलेल्या ट्रेंट लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये 7 टक्के उसळी पाहायला मिळाली होती. या तेजीसह कंपनीचे शेअर्स 4,629.40 रुपये या सर्वकालीन उच्चांक किमतीवर पोहचले होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तिमाही निकालाचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे. ( ट्रेंट लिमिटेड कंपनी अंश )

मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 110 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी ट्रेंट स्टॉक 2.62 टक्के वाढीसह 4,427 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

2024 या वर्षात ट्रेंट स्टॉक 51 टक्के मजबूत झाला आहे. मागील एका वर्षात ट्रेंट कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 222 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ग्लोबल ब्रोकरेज फर्म जेफरीजने ट्रेंट कंपनीच्या शेअर्सवर 4,150 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे.

देशांतर्गत ब्रोकिंग फर्म नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या तज्ञांच्या मते, कच्च्या मालाच्या किमती कमी झाल्याने ट्रेंट कंपनीने आपल्या एकूण मार्जिनमध्ये सुधारणा केली आहे. नुवामाने ट्रेंट स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन 4,926 रुपये टार्गेट प्राइससाठी पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे.

अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्मने ट्रेंट कंपनीच्या शेअर्सवर ‘बाय’ रेटिंग देऊन 4,876 रुपये टार्गेटसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने FY25 आणि FY26 मध्ये कंपनीची कमाई अनुक्रमे 13 टक्के आणि 19 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. मार्च तिमाहीत ट्रेंट कंपनीचा निव्वळ नफा 654.3 दशलक्ष रुपये नोंदवला गेला होता.

31 मार्च 2014 पर्यंत ट्रेंट कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये 545 Zoodio आउटलेट आणि 34 इतर लाईफस्टाईल स्टोअर्स आहेत. 31 मार्च 2024 पर्यंत ट्रेंट कंपनीचा निव्वळ नफा 513 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 105 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Trent Share Price NSE Live 01 May 2024.

हॅशटॅग्स

#Trent Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x