17 April 2024 2:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 17 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या IDFC First Bank Share Price | बँक FD असा परतावा देणार नाही! पण या बँकेचा शेअर अल्पावधीत देईल 50 टक्केपर्यंत परतावा Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! या टॉप 3 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 57 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरमध्ये मोठी घसरण होणार? गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं? अपडेट आली Lloyds Metal Share Price | कुबेर कृपा करणारा 11 रुपयाचा शेअर, गुंतवणूकदार 3 वर्षात करोडपती झाले, खरेदी करणार? TCS Share Price | तज्ज्ञांकडून टीसीएस शेअर्सला 'ओव्हरवेट' रेटिंग, जाहीर केली मजबूत टार्गेट प्राईस
x

चप्पल घालून मंदिरात प्रवेश केल्याने दोन गटात हाणामारी | पडळकरांच्या भावासह 12 जणांवर गुन्हा दाखल

BJP MLA Gopichand Padalkar, brother, Case file, Sangli

सांगली, १८ नोव्हेंबर: कोरोनामुळे गेल्या 8 महिन्यांपासून बंद असलेली मंदिर अखेर सुरू करण्यात आली आहे. मात्र, सांगलीमध्ये चप्पल घालून मंदिरात गेल्याच्या कारणावरून आटपाडी तालुक्यातील झरे इथं दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. धक्कादायक म्हणजे, या प्रकरणात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भावासह (BJP MLA Gopichand Padalkar’s brother) 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आटपाडी तालुक्यातील झरे गावात 17 नोव्हेंबर रोजी दुपारी गावातील महालिंगराय मंदिरात ही घटना घडली, असे वृत्त दैनिक महाराष्ट्र टाइम्सने दिले. या प्रकरणी शांताबाई मारुती मासाळ (वय 60) यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

आटपाडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर हे मंगळवारी दुपारी काही मित्रांसह मासाळवाडी येथील मंदिरात देवदर्शनासाठी गेले होते. यातील काहीजण चपला घालून मंदिरात गेल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. यावरून दोन गटात वादाला सुरुवात झाली. शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन दोन्ही गट आमनेसामने भिडले. यात दोन्हीकडील वाहनांच्या काचा फोडून दहशत माजवली. याबाबत शांताबाई मारुती मासाळ यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

या फिर्यादीनुसार ब्रह्मानंद पुंडलिक पडळकर (रा. झरे) गणेश भुते (रा. भिंगेवाडी), नवनाथ मारुती सरगर (रा. झरे), अनिल सूर्यवंशी (रा. गोंदिरा), विठ्ठल पाटील (रा. वेळापूर, जि. सोलापूर) आणि सत्यजीत पाटील (रा. विटा) या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पडळकर यांच्या फिर्यादीनुसार मासाळवाडीतील सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मारामारीच्या घटनेत पडळकर आणि त्याच्या मित्रांनी गळ्यातील मंगळसूत्र तोडले, तसेच मंदिराबाहेर लावलेल्या गाडीतील ८२ हजार रुपये लांबवल्याची तक्रार शांताबाई मासाळ यांनी फिर्यादीत केली आहे. आटपाडी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

 

News English Summary: The temple, which has been closed for the last 8 months due to corona, has finally been reopened. However, in Sangli, two groups clashed at Jhare in Atpadi taluka due to wearing slippers and going to the temple. Shockingly, 12 people, including the brother of BJP MLA Gopichand Padalkar, have been charged in the case. The incident took place at noon on November 17 at the Mahalingarai temple in Jare village in Atpadi taluka, the Daily Maharashtra Times reported. Shantabai Maruti Masal (age 60) has lodged a complaint at Atpadi police station.

News English Title: BJP MLA Gopichand Padalkars brother and 12 others case file against registered in Sangli News updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x