15 December 2024 10:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

अर्णब गोस्वामींनी गरळ ओकलेल्या विषयांना पुन्हा हवा देण्याचा राम कदमांकडून प्रयत्न?

BJP MLA Ram Kadam, Janakrosh Yatra, Palghar lynching

मुंबई, १८ नोव्हेंबर: भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम (BJP MLA Ram Kadam) यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पालघर जिल्ह्यातील मॉब लिंचिंग प्रकरणी (Palghar Mob Lynching Case) आमदार राम कदम यांनी जनआक्रोश यात्रेचं आयोजन केले होते. आमदार राम कदम यांच्या खार येथील निवासस्थानापासून या यात्रेला सुरुवात होणार होती. मात्र घराबाहेर पडताच पोलिसांनी राम कदम यांना ताब्यात घेतलं आहे. राम कदम यांच्यासह १०० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

राम कदम आज (18 नोव्हेंबर) सकाळी 8.30 वाजता खार येथील आपल्या निवासस्थानापासून ते पालघरमधील हत्याकांड झालेल्या घटनास्थळापर्यंत जनआक्रोश यात्रा काढणार असल्याचं जाहीर केलं होतं. पालघर हत्याकांड प्रकरणाला 211 दिवस उलटले आहेत. मात्र अद्याप यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे याच्या निषेधार्थ ही यात्रा काढण्यात येणार होती.

मुंबई पोलिसांनी सकाळपासून राम कदम यांच्या निवासस्थानाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. पोलिसांचा मोठा फौजफाटा यावेळी हजर होता. राम कदम यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात येथे जमा झाले होते. यावेळी ‘भारत माता की जय’ ची घोषणाबाजी केली जात होती. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांनी कारवाई करत राम कदम आणि त्यांच्या काही समर्थकांना ताब्यात घेतलं आहे. यावेळी त्यांनी हा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु असून दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. मात्र या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी पार पडणार आहे असं असताना देखील राम कदम राज्यातील विवादित विषयांना खतपाणी घालून कोणाच्या सांगण्यावर वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील बहुचर्चित पालघर मॉब लिंचिंग प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर सुप्रीम कोर्ट एकत्र सुनावणी घेणार आहे. या हत्याकांडात दोन साधूंसह चालक अशा तीन जणांना ठार मारले गेले होते. कोर्टाने महाराष्ट्र सरकारद्वारे दाखल करण्यात आलेल्या चौकशी अहवाल रेकॉर्डमध्ये घेतला आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणातील सगळ्या याचिका सुनावणीसाठी एकत्र घेण्यासाठी रजिस्ट्रारला ४ महिन्यांपूर्वीच आदेश दिले होते.

सर्वोच्च न्यायालयात तीन स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आल्या असून सीबीआय / एसआयटीकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने सीलबंद लिफाफ्यात चौकशी अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत १०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली होती आणि पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. १६-१७ एप्रिलच्या रात्री दोन साधू आपल्या ड्रायव्हरसह गावातून जात होते तेव्हा लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. ज्यामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला होता.

 

News English Summary: BJP MLA Ram Kadam has been arrested by the police. In the Palghar Mob Lynching Case, MLA Ram Kadam had organized a Janakrosh Yatra. The yatra was to start from the residence of MLA Ram Kadam at Khar. However, the police have arrested Ram Kadam as soon as he left the house. Police arrested 100 activists including Ram Kadam.

News English Title: BJP MLA Ram Kadam Janakrosh Yatra Palghar lynching News updates.

हॅशटॅग्स

#RamKadam(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x