20 June 2021 10:47 PM
अँप डाउनलोड

९२-९३ च्या दंगलीत गुजराती बांधवांना शिवसेनेने मदत केली | भाजपने फक्त मतदानासाठी वापरले

Shivsena, Hemraj Shah, BJP leaders, Gujarati voters

मुंबई, ६ जानेवारी: मुंबई महानगरपालिका शिवसेनेसाठी राजकीय दृष्ट्या अत्यंत उच्च स्थानी असल्याने मुंबईची सत्ता स्वतःकडे ठेवण्यासाठी सर्वोच्च प्रयत्न करेल यात शंका नाही. त्यासाठी मराठी मतदारांपासून अमराठी मतदार देखील शिवसेनचं लक्ष आहेत. मराठी मतदार भाजपाकडे वर्ग होण्याची शक्यता कमी असून अमराठी मतदारांवरच त्याची राजकीय मदार असेल. शिवसेनासोबत नसल्याने भाजपाला मोठा राजकीय फटका बसणार यात शंका नाही. मात्र भाजपाची वोट बँक तोडण्यासाठी देखील शिवसेना तयारीला लागली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

शिवसेनेने यासाठी अमराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ असं म्हणत शिवसेनेने गुजराती मतदारांना साद घातली आहे. एका बाजूला भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे.

दरम्यान शिवसेना देखील अमराठी मतांसाठी जोरदारपणे तयारीला लागली आहे. याचाच भाग म्हणून शिवसेनेकडून ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ मोहीम सुरु करण्यात आली आहे. शिवसेनेकडून गुजरातींसाठी मेळावा आयोजित करण्यात आला असून त्याला ही अशी टॅगलाईन वापरण्यात आली आहे. शिवसेना संघटक हेमराज शाह यांच्यावर गुजराती मतदारांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

गुजराती माणसाने बाळासाहेबांच्या शिवसेनेला नेहमी आपले मानले, १९९२-१९९३ च्या दंगलीमध्ये गुजराती बांधवाना खरी मदत केली, संरक्षण दिले ते शिवसेनेने आणि बाळासाहेब ठाकरे यांनी, मी मुंबईकर म्हणून मुंबईतील सर्व धर्मियाना आपलेपण दिले ते उद्धव ठाकरे यांनी, भारतीय जनता पक्षाने फक्त मतदान होण्यापुरते गुजराती बांधवांना वापरले. आपडो माणस म्हणत नुसती गुजराती बांधव आणि भगिनींची मते घेतली आणि नंतर सगळ्यांना वाऱ्यावर सोडले असा आरोप हेमराज शहा यांनी केला.

 

News English Summary: The Gujarati man has always considered Balasaheb’s Shiv Sena as his own, he really helped the Gujarati brothers in the 1992-1993 riots, it was the Shiv Sena and Balasaheb Thackeray who gave him protection . Hemraj Shah alleged that he took the opinions of Gujarati brothers and sisters and then left them all to chance.

News English Title: Shivsena leader Hemraj Shah criticised BJP leaders over Gujarati voters politics news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1097)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x