14 December 2024 10:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Schools Reopen | आजपासून शाळा सुरु | काय आहे नियमावली?

Schools reopen

मुंबई, ०४ ऑक्टोबर | मागील दीड वर्षापासून बंद असणाऱ्या शाळा आजपासून (Schools Reopen) सुरू होत आहेत. यासाठी शाळा प्रशासनाने देखील स्वच्छता आणि सॅनिटझर करण्यासाठी सुरुवात केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेल्या शाळा सुरू होत असल्यामुळे आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. सरकारच्या वतीने दिलेल्या नियमाचे पालन करून शाळा सुरू केल्या जात आहे. काही विद्यार्थी एक दिवस तर काही विद्यार्थी दुसऱ्या दिवशी शाळेत येणार आहेत. जे विद्यार्थी घरी असतील त्यांना ऑनलाइन शिक्षण देखील दिले जाणार आहे.

Schools Reopen. For this, the school administration has also started cleaning and sanitizing. There is an atmosphere of joy as the schools that have been closed for the last several days are being reopened :

जवळपास दीड वर्षाच्या अंतरांनंतर शाळा पून्हा एकदा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने गजबजणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दीड वर्षे राज्यातील शाळा बंद आहेत. सद्य:स्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाने शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग असलेल्या शाळा पहिल्या टप्प्यात सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्य सरकारने दिलेल्या नियमावलीनुसार एकदिवसाआड शाळा भरणार आहेत. तसेच एका बेंचवर एकाच विद्यार्थ्याला बसायला परवानगी असेल. पालकांनी आपल्या पाल्याला बिनधास्त शाळेत पाठवावे. शाळेतील प्रत्येक वर्गखोली स्वच्छ धुऊन पुसून सॅनिटायझर केलेली आहे. वॉशबेसिनमध्ये हॅण्डवॉश आहेत. फिजिकल डिस्टन्सवरच विद्यार्थी बसण्याची सोय आहे. आमच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक दोन्ही लसी घेतल्या आहेत. खूप आनंद होत आहे एवढे अंतराने शाळा सुरू झाल्या आहेत. असे टिळक नगर येथील लोकमान्य टिळक हायस्कूलचे सचिव सुहास मराठे यांनी सांगितले.

काय आहे नियमावली:
* एका बेंचवर एक विद्यार्थी बसेल.
* शाळा प्रवेशासाठी पालकांची मंजुरी आवश्यक असेल.
* सर्व विद्यार्थी शाळेत येणार असतील तर एक दिवस आड शाळा भरेल.
* शाळेत एका दिवशी 15 ते 20 विद्यार्थ्यांनाच प्रवेश असेल.
* शाळेत सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक असेल.
* मास्क घालणे अनिवार्य असेल.
* शाळेत सॅनिटायजरचा वापर करणेही गरजेचे आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Schools reopen in Maharashtra after long time of corona pandemic.

हॅशटॅग्स

#SchoolsReopen(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x