29 March 2024 8:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

Pandora Papers Exposed | पेंडोरा पेपर्समध्ये तेंडूृलकरसह, शकीरा आणि जगभरातील अनेक श्रीमंतांचा समावेश

Pandora Papers Exposed

वॉशिंग्टन, ०४ ऑक्टोबर | जगभरातील महत्त्वाचे नेते, प्रसिद्ध उद्योगपतींसह विविध क्षेत्रांतील नामवंतांचा ‘पेंडोरा पेपर्स’मध्ये समावेश (Pandora Papers Exposed) असल्याचा खुलासा इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्ट्स (आयसीआयजे) यांनी केला आहे. या रिपोर्टनुसार या प्रकरणात अनेक भारतीयांसह 35 वर्तमान आणि माजी जागतिक नेते, 330 हून अधिक राजकारणी आणि 91 देश आणि प्रदेशातील सार्वजनिक अधिकारी यांचा समावेश आहे. तसेच या प्रकरणात भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर, पॉप सिंगर दिवा शकीरा, सुपरमॉडेल क्लाउडिया शिफर आणि लेल द फॅट वन म्हणून ओळखला जाणारा इटालियन मोबस्टर यांचाही समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे.

Pandora Papers Exposed riches world leaders in unprecedented leak. According to the report, the case involves 35 current and former world leaders, including many Indians, more than 330 politicians and public officials from 91 countries and regions :

या तपासात, कर चुकवण्यासाठी वापल्या जाणाऱ्या पद्धतींचादेखील खुलासा झाला आहे. तसेच यात रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचे मंत्री आणि भारत, रशिया, अमेरिका, मेक्सिको आणि इतर राष्ट्रांतील 130 पेक्षा जास्त अब्जाधीशांच्या आर्थिक व्यवहाराचे तपशील या फायलींमध्ये आहेत. या अहवालानुसार, पेंडोरा पेपर्समध्ये युक्रेन, केनिया आणि इक्वेडोरचे अध्यक्ष, झेक प्रजासत्ताकचे पंतप्रधान आणि माजी ब्रिटिश पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचे व्यवहार उघडकीस आले.

आयसीआयजे हे यूएसमधील पत्रकार आणि मीडिया संस्थांचा समावेश असलेली एक संघटना आहे. यामध्ये 100 पेक्षा जास्त देशातील 600 पेक्षा जास्त पत्रकारांचा समावेश आहे. ही संघटना जो पेपर प्रकाशित करते तो ‘पेंडोरा पेपर्स’ म्हणून ओळखला जातो.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Pandora Papers Exposed riches world leaders in unprecedented leak.

हॅशटॅग्स

#Business(49)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x