28 March 2023 8:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRCTC Railway Ticket Discount | खुशखबर! वरिष्ठ नागरिक रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी, तिकीट मध्ये पुन्हा सूट मिळणार? Facial Cleansing | त्वचा टॅन होते आणि त्वचेवर धूळ बसते, पार्लरमध्ये न जाता 'या' स्टेप्सने घरीच तुमचा चेहरा करा स्वच्छ Max Cinema Hall | हा छोटा मिनी प्रोजेक्टर घरात चित्रपट गृह आणि क्रिकेट स्टेडियमचा आनंद देतोय, किंमत आणि फीचर्समुळे प्रचंड मागणी IRCTC Railway Ticket | रेल्वेने तिकीट बुकिंगचे नियम बदलले, प्रवासापूर्वी हे लक्षात ठेवा अन्यथा तुम्हाला सीट मिळणार नाही Saving Account | एका व्यक्तीला बँक सेविंग अकाऊंटची मर्यादा किती आहे? हे नियम लक्षात ठेवा अन्यथा नुकसान Minimum Salary of EPF | तुमचा किमान पगार किती आहे? कारण पेन्शनची रक्कम वाढणार, नवा प्लॅन लक्षात ठेवा Business Idea | कधीही बंद न पडणाऱ्या या व्यवसायात उतराल तर मोठी कमाई कराल, सरकारी मदत सुद्धा मिळतेय
x

Navratri Garba | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरब्यावर बंदी योग्यच - महापौर

Navratri Garba

मुंबई , ०२ ऑक्टोबर | कोरोनाचा प्रसार कमी होत असला, तरी तो पूर्णपणे गेलेला नाही. गरब्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते. कोरोना नियमांचे पालन होणार नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने गरब्यावर घातलेली बंदी ही योग्यच असल्याचे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Navratri Garba) यांनी म्हटले आहे. भाजपच्या सेल्फी विथ खड्डा आंदोलनाची खिल्ली महापौरांनी उडवली आहे.

Navratri Garba. Although the spread of corona is declining, it is not completely gone. There can be a large crowd and Corona guidelines may not be follow. Therefore, the ban imposed on Garba by the municipal administration is justified, said Mumbai Mayor Kishori Pednekar :

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने यंदाही गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्र साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्याचवेळी गरबा नृत्याला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने त्यावर बंदी घालण्यात आली आहे. या संदर्भात महापौर बोलत होत्या. यावेळी बोलताना गरब्याला लाख दीड लाख लोक एकत्र येऊ शकतात. त्यावेळी सगळे मास्क लावणार आहेत का? जर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर त्याला जबाबदार कोण? असे प्रश्न महापौरांनी उपस्थित केले आहेत. गरब्यानिमित्त अर्ध्यापेक्षा अधिक मुंबईकर रस्त्यावर येतील. कोरोना नियमांचे पालन होणार नाही, त्यामुळे गरब्यावर घातलेली बंदी योग्यच असल्याचे महापौरांनी म्हटले आहे.

क्लीनअप मार्शलवर गुन्हा:
अजून कोरोना संपलेला नाही, प्रत्येकाने मास्क लावावा, यासाठी क्लीनअप मार्शल लावले आहेत. मार्शलकडून जे काही प्रकार सुरू आहेत ते बरोबर नाही, तो गुन्हा आहे. नियमबाह्य काम करणाऱ्या मार्शल आणि कॉन्ट्रॅक्टर या दोघांवर गुन्हा दाखल केला जाईल. क्लीनअप मार्शलचा ताबा हा पालिकेकडे असावा. क्लीनउप मार्शल म्हणून काम करण्याआधी त्यांची मुलाखत घेणार, त्यांची पार्श्वभूमी तपासली जाईल असे महापौरांनी सांगितले. सोमवारी यावर पालिका आयुक्तांनी बैठक लावली आहे त्यामुळे नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये असे आवाहन महापौरांनी केले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Navratri Garba banned is right decision because on covid situation said Kishori Pednekar.

हॅशटॅग्स

#NavratriGarba(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x