13 May 2021 3:18 AM
अँप डाउनलोड

पादचारी पूल दुर्घटना; स्ट्रक्चरल ऑडिटर नीरजकुमार देसाई अटकेत

Mumbai, Shivsena

मुंबई : मुंबई महापालिकेच्या मुख्यालयापासून काही अंतरावर असलेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकूण ६ जण मृत्युमुखी पडले, तर तब्बल ३१ जण गंभीर जखमी झाले होते. या दुर्घटनेप्रकरणी चुकीचा स्ट्रक्चरल अहवाल दिल्याचा ठपका असलेलस स्ट्रक्चरल ऑडिटर नीरजकुमार देसाई याला अटक करण्यात आली आहे. सदोष मनुष्यवधाप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

तत्पूर्वी मुंबई महापालिकेनेही कारवाई केली होती. पूल दुर्घटनाप्रकरणी संबधित अभियंत्यांना तातडीने निलंबित करण्यात आले होते तर निवृत्त अभियंत्यांची चौकशी केली जाणार आहे. स्ट्रक्चरल ऑडिटचा चुकीचा अहवाल देणाऱ्या देसाई कन्सल्टन्सला काळ्या यादीत टाकले आहे. तर कंत्राटदार आरपीएस कंपनीला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1081)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x