सातारा : आम्ही फक्त शरद पवार साहेबांशी बांधील आहोत. बाकी साताऱ्यातून कोणाला उमेदवारी दिली अथवा नाही दिली याची माहिती आम्ही शरद पवार साहेबांकडून घेऊ शकतो अशा शब्दात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांना टोला लगावला आहे.
साताऱ्यात कोणी किती विरोध केला तरी इथून माझी उमेदवारी राष्ट्रवादीतून फायनल आहे. मी केवळ दिल्लीतील निर्णयाला महत्व देतो आणि इथल्या गल्लीतील गोंधळाला आम्ही काहीच महत्व देत नाही असं रामराजे नाईक निंबाळकरांनी जिल्हा बॅंकेत आयोजित पत्रकार परिषदेत सूचित केलं आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब कर्नाटक निवडणुकीच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज घेऊन योग्य तो निर्णय घेतील असं रामराजे निंबाळकर यांनी पत्रकारांना सांगितलं. आम्ही साताऱ्यात नसलो की, इथे अनेकांच्या कॉलर उडतात असा टोला लगावत रामराजे निंबाळकरांनी राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.
