17 November 2019 9:54 PM
अँप डाउनलोड

खड्ड्यांची झळ युतीच्या मंत्र्यांनीही भोगावी म्हणून, मनसेने मंत्रालयाच्या मुख्य गेट'वरील रस्ता खोदला

मुंबई : खड्डेयुक्त आयुष्याला कंटाळलेल्या जनतेच्या वेदना थोडयाफार प्रमाणात का होईना या उद्देशाने मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट मुंबईमधील मंत्रालयाच्या मुख्य गेटसमोरील रस्ताच कुदळ मारून फोडला आहे. भाजप सेनेच्या मंत्र्यांना याची झळ बसावी आणि योग्य संदेश सरकार दरबारी पोहोचावा या उद्देशाने मनसेच्या कार्यकर्त्यांनी हा आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे समजते.

कालच मनसेच्या कार्यकर्त्यांनी तुर्भे येथील पीडब्ल्यूडी’चे कार्यालय फोडले होते. कारण नुकताच बांधला गेलेला सायन-पनवेल हायवे रस्त्याची एकाच पावसाने अक्षरशः चाळण झाली असून त्यामुळे अनेक लोकांनी अपघातामुळे आपले प्राण गमावले आहेत. खड्डे बुजवण्याची अनेक विनंत्या करून सुद्धा संबंधित खातं काहीच हालचाली करताना दिसत नसल्याने अखेर सुस्त प्रशासनाला गांभीर्य पटवून देण्यासाठी पीडब्ल्यूडी’चे कार्यालयच फोडावे लागले.

मुंबई आणि आसपासच्या शहरातील रस्त्यांची पावसाने अक्षरशः दुरावस्था झाली असल्याने प्रवाशांच्या मनात सुद्धा सरकारविरोधात खदखद वाढत असल्याने सामान्य जनतेला सुद्धा मनसेचं आंदोलन योग्य वाटू लागलं आहे.

VIDEO; मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट मुंबईमधील मंत्रालयाच्या मुख्य गेटसमोरील रस्ताच कुदळ मारून फोडला आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(472)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या