12 December 2024 3:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे
x

कोरोना आपत्तीत सुद्धा भाजपकडून आंदोलनासाठी लहान मुलांचा वापर, निष्काळजीपणाचा कहर

CM Uddhav Thackeray, BJP Maharashtra Bachhao

मुंबई, २२ मे : देशातील २० टक्के करोना रुग्ण महाराष्ट्रात असून राज्य सरकारची निष्क्रियता सातत्याने पहायला मिळत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्य सरकार आणि त्यांचे मंत्री आभासी जगात जगत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. सोशल मीडियावर पेड गँग तयार करुन आणि काही लोकांना आपला प्रवक्ता करुन आपण लढाई जिंकू असं सरकारला वाटत आहे असंही ते म्हणाले आहेत. करोना मुकाबल्यासाठी उपाययोजना करण्यात महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरल्याची टीका करत भाजपाने ‘ माझे अंगण, माझे रणांगण‘ आंदोलनाची हाक दिली आहे.

मात्र कोरोना आपत्तीत सरकारने लहान मुलांची आणि वरिष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिलेला असताना देखील भाजपच्या नेत्यांनी काही ठिकाणी लहान मुलांना आंदोलनात उतरवलं आणि बाहेर असताना देखील मास्क असून पण ते मुलांच्या तोंडावर नसल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, शिवसेनेने भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. भाजपने आज महाराष्ट्र बचाव आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाविरोधात शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून टीकास्त्र सोडण्यात आले आहे. विरोधकांत शहाणपण उरले आहे काय, असा सवाल ‘सामना’मधून विचारण्यात आला आहे. विरोधकांचे अंगण तर सरकारचे रणांगण सुरु आहे. डोकमकावळ्यांची फडफड सुरुच असल्याची जोरदार टीका करण्यात आली आहे.

प्रदेश भाजपचे ‘महाराष्ट्र बचाव आंदोलन’ म्हणजे नेमके काय, असा सवाल उपस्थित करत शिवसेनेने भाजपला टोकले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारच्या हाती महाराष्ट्र सुरक्षित असल्याची भावना जनतेची आहे. त्यामुळे सध्याच्या उठवळ विरोधी पक्षापासूनच महाराष्ट्राला वाचवा, असे सांगण्याची वेळ आली आहे, असे ‘सामना’ संपादकीयमध्ये म्हटले आहे.

 

News English Summary: However, despite the government’s advice to take special care of children and senior citizens in the Corona disaster, BJP leaders in some places have taken children into agitation and even when they are out, they are wearing masks but not on their faces.

News English Title: Corona virus Lockdown Bjp Devendra Fadanvis On Mahavikas Aghadi Shivsena CM Uddhav Thackeray News latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x