27 July 2021 2:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

मनसेच्या दणक्यानंतर 'द शर्ट' कंपनीकडून कामगारांच्या रखडलेल्या १० महिन्यांच्या पगाराचे वाटप सुरु

नवी मुंबई : नवी मुंबई मधील “द शर्ट” नावाच्या कंपनी मध्ये काम करत असलेल्या कामगारांचे पगार मागील दहा महिन्यापासून रखडले होते. त्यात अनेक ठिकाणी दाद मागून सुद्धा कंपनीचे व्यवस्थापक मंडळ कामगारांच्या पोटापाण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत होते.

BhagyaVivah Marathi Matrimonial

संबंधित कामगारांनी मनसेचे ठाणे तसेच पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्याकडे या विषयी पाठपुरावा करण्याची विनंती केली होती. त्यानंतर अविनाश जाधव यांच्यासहित महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस सचिन गोले , मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, नवी मुंबई मनसेचे शहर सचिव संदीप गलुगडे, विभाग अध्यक्ष शरद डिगे, लीलाधर घाग, शाखा अध्यक्ष चंद्रकांत डांगे, डॉ. विशाल ढोक, अरुण पवार, प्रफुल्ल फळसमकर, शुभम धुमाळ, अभिजीत कोलेकर, प्रशांत इंगले यांनी थेट नवी मुंबई मधील “द शर्ट” कंपनीवर धडक दिली होती.

त्यानंतर कंपनी व्यवस्थापनाबरोबर झालेल्या बैठकीत संबंधित कंपनीने पुढील पंधरा दिवसाच्या आत सर्व कामगारांचे प्रलंबित पगार दिले जातील असं आश्वासन मनसे कामगार सेनेच्या शिष्टमंडळाला दिल होत. त्यानुसार आज सर्व कामगारांना पगाराचे वाटप सुरु झाले आहे. सर्व कामगारांनी त्याबद्दल मनसेचे आभार मानले आणि अनेक महिन्यांपासून पोटाला चिमटा काढून बसलेल्या सामान्य कामगारांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत होता.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(670)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x