19 October 2021 8:12 AM
अँप डाउनलोड

व्हॉट्सअॅप ग्रुप कॉलची सुविधा राजकारण्यांसाठी निवडणुकीत 'डिजिटल चावडी सभा' होण्याची शक्यता?

नवी दिल्ली : आजच व्हॉट्सअॅपने ग्रुप कॉलची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. विशेष म्हणजे व्हॉइस व व्हिडीओ कॉल या दोन्ही पर्यायांमध्ये या ग्रुप कॉलची सुविधा देण्यात आली आहे. परंतु त्यात एकाच वेळी कमाल ४ जणांना एकाचवेळी एकमेकांशी संवाद साधता येईल. अँड्रॉइड तसेच आयओएस या दोन्ही प्रणालींवर ही नवी सुविधा उपलब्ध असेल असं कंपनीने म्हंटल आहे. जगभरातील जवळपास दीड अब्ज युजर्स या ग्रुप कॉलिंग सुविधेचा लाभ घेऊ शकतील.

BhagyaVivah Marathi Matrimonial

वास्तविक सामन्यांसाठी ही सुविधा फायद्याची असली तरी राजकीय मंडळी सुद्धा या सुविधेचा फायदा मोठ्या प्रमाणावर करतील अशी शक्यता तंत्रज्ञानातील सल्लागार सांगत आहेत. सध्या भारतातील राजकारण हे समाज माध्यमांवर मोठ्याप्रमाणावर आल्याने त्याच्या मोठा फायदा त्यांना निवडणुकीदरम्यान घेता येईल असं म्हटलं जात. इतकाच नाही तर निरनिराळ्या शहरात राहणारे अनेक पक्षांचे कार्यकर्ते एकाच वेळी आणि टप्याटप्याने ‘डिजिटल बैठक’ सुद्धा आयोजित करू शकतील अशी शक्यता आहे.

त्यामुळे या सुविधेचा फायदा सामान्यांबरोबरच राजकारणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर करतील यात शंका नाही. सध्या एकावेळी फक्त ४ जण व्हॉइस व व्हिडीओ कॉल करू शकत असले तरी भविष्यात त्याची मर्यादा टप्याटप्याने वाढवली जाऊ शकते असं तंत्रज्ञानातील तज्ज्ञांच मत आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x