25 June 2022 2:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
निवडून येणारे शिंदेंसोबत | पण त्यांना निवडून आणणारे पदाधिकारी, कार्यकर्ते उद्धव ठाकरेंसोबत | पदाधिकाऱ्यांना राजकीय संधी Multibagger Stocks | या शेअरचे गुंतवणूकदार करोडपती झाले | 35519% रिटर्न | 50 हजाराचे 1 कोटी 78 लाख झाले शिंदेंकडून प्रॉपर्टीवर स्वतःच्या वडिलांच्या नावाचा वापर | पण पक्षासाठी 'बाळासाहेब ठाकरे' यांच्या नावाचा वापर होणार? भाजपच्या सांगण्यावरून शिंदेंचा समर्थक आमदारांनाविरुद्धही गेम प्लॅन | सेनेतच असल्याचं सांगून भीषण प्लॅन रचला आहे Maharashtra Political Crisis | शिंदे गटातील 10 बंडखोर आमदार पवारांच्या संपर्कात | गुवाहाटीत धाकधूक वाढली MPSC Recruitment Updates | एमपीएससी अभ्यासक्रम बदलणार | मुख्य परीक्षेत मोठे बदल होणार SBI Share Price | एसबीआय शेअर 673 रुपयांच्या पार जाणार | तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

VIDEO | दिल्लीच्या सीमेवर तणाव वाढला | शेतकऱ्यांनी पोलीस बॅरिकेड्स तोडले

Farmers, Broken down barricades, Delhi-Haryana Tikri border

नवी दिल्ली, २६ जानेवारी: देशात आज ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय. देशावर करोनाचं संकट असलं तरी देशवासियांत मात्र उत्साह कायम आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं राजपथाहून आज परेड निघणार आहे. दुसरीकडे दिल्ली सीमेवर कृषी कायद्यांचा निषेध करणाऱ्या शेतकरी संघटनांकडून आज ट्रॅक्टर रॅलीही काढण्यात येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राजपथावर आणि राष्ट्रीय राजधानीच्या सीमांवर हजारो सशस्र सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.

यादरम्यान दिल्लीच्या दिशेने निघालेल्या हजारो शेतकऱ्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्टस तोडले आहेत. राजपथावरील संचलन पार पडल्यानंतर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यास शेतकऱ्यांना परवानगी आहे.

दिल्ली-हरियाणाच्या तिकरी बॉर्डरवर पोलिसांनी सुरक्षेसाठी उभारलेले बॅरिकेड्स शेतकऱ्यांनी तोडले आहेत. हे शेतकरी पंजाबमधील किसान मजदूर संघर्ष समितीचे असल्याची माहिती मिळाली आहे. संयुक्त किसान मोर्चाने अद्याप मोर्चासाठी सुरुवात केलेली नाही. दरम्यान तिकरी बॉर्डरवर शेतकरी नेत्यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. पोलिसांसोबत बैठक घेऊन आंदोलनाची वेळ ठरवली जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज दोन महिने झालेत. केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत आणि एमएसपी कायदा लागू करावा म्हणून दिल्लीतील सहा सीमा अडवल्या आहेत. सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये अकरा बैठका होऊनही कोणताही तोडगा निघू शकला नाही. एक महिन्याभरापूर्वीच शेतकऱ्यांनी प्रजासत्ताकदिनी ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा केली होती. प्रशासनाने मान्यता दिल्याप्रमाणे उद्या तीन सीमांवरून प्रचंड रॅली निघत आहे.

 

News English Summary: Farmers have broken down barricades erected by the police for security on the Delhi-Haryana Tikri border. It is learned that this farmer belongs to Kisan Mazdoor Sangharsh Samiti in Punjab. Samyukta Kisan Morcha has not started for the morcha yet. Meanwhile, farmers’ leaders on the Tikri border have appealed to the protesters to remain calm. He informed that the time of the agitation will be decided by holding a meeting with the police.

News English Title: Farmers have broken down barricades erected by the police for security on the Delhi-Haryana Tikri border News updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x