16 July 2020 12:32 AM
अँप डाउनलोड

बेस्ट संप: 'बाबा किती खायचे ओ?' नितेश राणेंची व्यंगचित्रातून शिवसेनेवर टीका

मुंबई : आमदार नितेश राणे यांनी चक्क व्यंगचित्रातून उद्धव ठाकरेंवर बेस्ट संपाच्या विषयाला अनुसरून जोरदार निशाणा साधला आहे. मुंबईतील बेस्ट कामगारांच्या संपाचा आज सलग ७व्या दिवशी सुद्धा सुरूच आहे. त्यावरुन, नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

या व्यंगचित्राद्वारे त्यांनी, ज्याप्रमाणे मुंबईतील गिरण्या, खंटाबा यांच्या जागा खाल्ल्या, त्याचप्रमाणे बेस्ट खाऊन दाखवतो, असे उद्धव ठाकेर म्हणत असल्याचा टोलाही राणेंनी हाणला आहे. दुसऱ्या बाजुला आदित्य ठाकरे सुद्धा दिसत आहेत.

उद्धव ठाकरे आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी बेस्ट कामगार नेत्यांशी तब्बल सात तास चर्चा करुन सुद्धा तोडगा काढला नव्हता.त्यामुळे सर्वच स्तरातून आणि राजकीय पक्षांकडून शिवसेनेवर जोरदार टीका करण्यात येत आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(50)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x