4 August 2020 2:03 PM
अँप डाउनलोड

पाकिस्तानी महिला एजंटकडून तब्बल ५० भारतीय जवानांविरुध्द हनी ट्रॅप?

नवी दिल्ली: भारतीय लष्कराच्या तब्बल ५० जवानांविरुद्ध हनी ट्रॅप लावला गेल्याचे भारतीय लष्कराच्या प्राथमिक चौकशीत पुढे येत आहे. दरम्यान, या जवानांकडून लष्कराशी संबंधित गोपनीय आणि महत्वाची माहिती पाकिस्तानला पुरविण्यात आल्याचा संशय भारतीय लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

त्यामुळे लष्करानं या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर प्रकरणी सोमवीर नावाच्या जवानाला पोलीस आणि लष्करानं शुक्रवारी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. सोमवीरनं एका पाकिस्तानी तरुणीला समाज माध्यमांच्या माध्यमातून अति संवेदनशील माहिती पुरवत होता असा संशय आहे.

दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे याच तरुणीच्या फेसबुक फ्रेंड लिस्टमध्ये भारतीय लष्कराचे तब्बल ५० जवान आहेत. हे अकाऊंट ISI या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेकडून ऑपरेट होत असल्याची माहिती लष्कराला मिळाली आहे. त्यामुळे या ५० जवानांकडून अनेक महत्त्वपूर्ण विषयाची माहिती समाज माध्यमांच्या माध्यमातून पाकिस्तानला पुरविण्यात आली आहे का, याचा सखोल शोध सध्या भारतीय लष्कराकडून घेण्यात येत आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#IndianArmy(29)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x