20 June 2021 2:27 PM
अँप डाउनलोड

Special Recipe | कुरकुरीत आणि खमंग अश्या करंदीच्या वड्यांचा नक्की आस्वाद घ्या

crispy and tasty prawns vadi

मुंबई ६ मे : आपल्या घरी कोथिंबीर,कोबी,पालकाच्या वड्या नेहमी बनवल्या जातात पण नॉनव्हेज वड्या क्वचितच बनल्या जातात . खास त्यासाठी आम्ही ओल्या करंदीच्या वड्यांची पाककृती तुम्हाला सांगणार आहोत. या वड्या खमंग आणि कुरकुरीत लागतात. त्याचे साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

ओल्या करंदीच्या वड्या:

साहित्य :
२ वाटया सोललेली ओली करंदी ( छोटी कोलंबी )
२-३ हिरव्या मिरच्या
१” किसलेलं आलं
१ मध्यम आकाराचा चिरलेला कांदा
१ वाटी तांदळाचं पीठ
२ टीस्पून बेसन
१ टी स्पून हळद
२ टीस्पून घरगुती लाल मसाला
चवीसाठी मीठ आणि कोथिंबीर

कृती :
१) प्रथम एका ताटात करंदी सोलून घ्यावी. तिला पाणी घालून स्वच्छ करावी.
२) एका बाऊल मध्ये स्वच्छ केलेली करंदी घ्यावी. त्यात चिरलेला कांदा, मिरच्या ,किसलेलं आलं ,हळद ,घरगुती लाल मसाला व कोथिंबीर घालून थोडे एकजीव करून घ्यावे मग पुन्हा त्यात तांदळाचे पीठ आणि बेसन घालून एकत्र करावे .
३) मिश्रणाला टिक्कीसारखा आकार द्यावा .
४) एका पॅन मध्ये तेल गरम करून करंदीच्या वड्या शॅलो फ्राय करून घ्याव्यात.
या करंदीच्या वड्या हिरव्या चटणी सोबत सर्व्ह कराव्यात. चला तर मग संध्याकाळच्या नाश्त्यासाठी खमंग आणि कुरकुरीत वड्या तयार आहेत.

News English Summary: Cilantro, cabbage, spinach sticks are always made at home but non-vegetable sticks are seldom made. Especially for this we are going to tell you the recipe of wet karandi sticks. These sticks look delicious and crunchy. Its material and action are as follows.

News English Title: Crispy and tasty prawns vadi news update article.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x