15 May 2021 11:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
आपला शत्रू एक बहुरूपी आहे, तो कपडे बदलून फोटो काढत असतो - सुरेंद्र राजपूत ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या १० दिवसांनी नाशिकमध्ये प्रकटलेले, पण चंद्रकांतदादा म्हणाले फडणवीस आणि मी.... कोणत्या फेक न्यूज फॉलो करते ही? | म्हणाली, समजलं की ते गंगा नदीतील नाही तर नाजयेरियातील फोटो राजकीय विरोधकांचा 'छळ' ही एकमेव 'टूलकिट' मोदी, शहा आणि आदित्यनाथ वापरतात - काँग्रेस राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस
x

IND vs AUS 4th Test : भारताने ऑस्ट्रेलियात इतिहास रचला

सिडनी : भारतीय क्रिकेट संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली कांगारूंना त्यांच्याच मायभूमीत कसोटी मालिकेत गारद केले आणि इतिहास रचला आहे. आजचा ५वा दिवस सुद्धा पावसामुळे पूर्णपणे वाया गेला आणि अखेर शेवटची चौथी कसोटी अनिर्णीत राहिली. त्यामुळे भारताने २-१ अशी मालिका जिंकून इतिहास रचला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियात तब्बल ७२ वर्ष ११ कसोटी मालिका खेळल्यानंतर भारताने पहिल्यांदाच कांगारूंच्या भूमीत मालिका जिंकली आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाने आधीच ॲडलेड आणि मेलबर्न कसोटी सामने जिंकून कांगारूंविरुद्ध मालिकेत आघाडी घेतली होती. त्यामुळे सिडनी कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाला मोठी कामगिरी करणे अपेक्षित होते.

परंतु सामान्याच्या सुरुवातीपासूनच कांगारू प्रचंड दडपणाखाली दिसत होते. विराट टीमने त्यांना सुरुवातीपासूनच सावरण्याची एकही संधी दिली नव्हती. भारताने पहिल्या डावातच ६२२ धावांचा डोंगर रचला होता. चेतेश्वर पुजारा १९३ आणि रिषभ पंत १५९ नाबाद अशी खेळी करून भारताची बाजू भक्कम केली होती. आणि अखेर भारताने पहिला डाव ७ बाद ६२२ धावांवर घोषित केला होता.

विशेष म्हणजे भारतीय क्रिकेट संघ १९४७ मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळला होता. त्यानंतर आतापर्यंत ११ मालिकेत भारताला कसोटी सामान्यांच्या मालिकेत एकदाही विजय मिळवता आला नव्हता. त्यानंतर आता ७२ वर्षानंतर भारतीय संघाला कांगारूंच्या भूमीत यश आले आहे.

हॅशटॅग्स

#Indian Cricket Team(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x