11 August 2020 10:06 PM
अँप डाउनलोड

राफेलमुळे तोट्यातील रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स कंपनी कोट्यवधींच्या फायद्यात?

नवी दिल्ली : अनिल धीरूभाई अंबानी यांच्या अखत्यारीतील रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि अनेक वर्ष प्रचंड तोटा नोंदवणारी तसेच भांडवल बाजारात सूचिबद्ध नसलेली रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स लिमिटेड ही कंपनी राफेल डीलच्या कारणाने कोट्यवधींच्या नफ्यात आल्याचे वृत्त डिजिटल न्यूज ‘द वायर’ने प्रसिद्ध केलं आहे. त्यामुळे अनिल अंबानी राफेल डीलवरून पुन्हा संशयाच्या छायेत आला आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

राफेल डीलच्या व्यवहाराच्या निमित्ताने अनिल धीरूभाई अंबानी यांचा रिलायन्स समूह आणि फ्रान्सची दसॉल्ट एव्हिएशन या दोन्ही कंपन्या सध्या एकमेकांवर दोषारोप करत वेळ मारून घेत आहेत असं चित्र आहे. मात्र याविषयात फ्रान्स आणि भारत या दोन्ही देशांनी संबंधित नियामक यंत्रणांना सादर केलेल्या कागदपत्रांवरून फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशनने अनिल धीरूभाई अंबानी यांच्या रिलायन्ससोबत २०१७ मध्ये संयुक्त कंपनी स्थापन करण्यासाठी मोजलेले सुमारे चाळीस दशलक्ष युरो हे अनिल धीरूभाई अंबानी यांच्या प्रचंड तोट्यातील रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स लिमिटेड या भांडवली बाजारात सूचिबद्ध नसलेल्या कंपनीतील तब्बल ३४.७ टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी होते, असा दावा डिजिटल न्यूज ‘द वायर’ने केला आहे. दरम्यान, हा सौदा २०१७-१८ या आर्थिक वर्षात झाला होता असं म्हटलं आहे. यामध्ये रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स लिमिटेड’ने प्रति दहा रुपये दर्शनी मूल्याचे २४,८३,९२३ समभाग (शेअर्स) एकूण २८४.१९ कोटी रुपयांना दसॉल्टला विकले घेतले होते असा दावा करण्यात आला आहे.

फ्रान्सची दसॉल्ट एव्हिएशन संरक्षण क्षेत्रातील महाकाय कंपनी असून अशा कंपनीने भांडवल बाजारात सूचिबद्ध नसलेल्या रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स लिमिटेड’मध्ये हिस्सा खरेदी करण्यात कसा काय रस घेतला असा प्रश्न त्यामुळे उपस्थित करण्यात येत आहे. परंतु, या दोन्ही कंपन्यांकडून अजून याविषयी काहीच स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, यापूर्वी रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स लिमिटेड’ने २०१६-१७ या आर्थिक वर्षामध्ये १०.३५ लाख रुपये तोटा तर २०१५-१६ या आर्थिक वर्षात ९ लाख रुपये तोटा नोंदवला होता. याच कंपनीने अनिल धीरूभाई अंबानी समूहातील इतर कंपन्यांतून गुंतवणूक केली होती. आणि धक्कादायक म्हणजे त्यातील बहुतांश कंपन्या या अनेक वर्षांपासून केवळ तोट्यात सुरु होत्या.

त्यातच रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स लिमिटेड’ला महाराष्ट्र राज्य सरकारने २००९ मध्ये ६३ कोटी रुपयांचे विमानतळ प्रकल्प विकासाची काही कामे दिली होती. परंतु या प्रकल्पांना अनिल धीरूभाई कंपनी समूहाकडून कोणतीच गती देण्यात न आल्याने अखेर हे प्रकल्प त्यांच्याकडून काढून घेण्यात आल्याचे सुद्धा एका वृत्तात नमूद करण्यात आले आहे. अशाप्रकारे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या वार्षिक अहवालात रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स लिमिटेड’मधील समभाग विक्रीमुळे २८४.१९ कोटी रुपये इतका प्रचंड नफा झाल्याची नोंद या तोट्यातील कंपनीने केली आहे असा दावा केला आहे. त्याचवेळी फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशनच्या लेखा नोंदीत रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स लिमिटेड’बरोबर झालेला समभाग खरेदी व्यवहार ३,९९,६२,००० युरोला झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स लिमिटेड’कडे हा व्यवहार केवळ ९,६२,००० युरोंना झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x