17 May 2021 2:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
केंद्राने जगभरात लसी फुकट वाटल्या, त्यांच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागतंय - रुपाली चाकणकर संपूर्ण पोलीस दल कोरोना आपत्तीत लोकांसाठी कर्तव्यावर | तर राज्याचे पोलीस महासंचालक सुट्टीवर प. बंगाल | सीबीआय'च्या TMC नेत्यांवर धाडी, ममता बॅनर्जी थेट CBI कार्यालयात प. बंगालच्या राज्यपालांकडून खटला दाखल करण्याची परवानगी घेत TMC नेत्यांवर सीबीआयच्या धाडी गेल्या २४ तासांत २ लाख ८१ हजार ३८६ नवे कोरोना रुग्ण | ४,१०६ रुग्णांचा मृत्यू हट्टी मोदी सरकार वैज्ञानिकांचे सल्ले देखील ऐकत नाहीत | डॉ. जमील यांचा कोरोना सल्लागार गट प्रमुख पदाचा राजीनामा DRDO कोरोना औषध 2DG तयार | रुग्णांकडे लवकरात लवकर पोहोचविण्यापेक्षा लॉन्च इव्हेंटला महत्व
x

शबरीमला मंदिरात दोन महिलांनी घेतले भगवान अयप्पा यांचे दर्शन

केरळ : केरळमधील २ महिलांनी शबरीमला येथील भगवान अयप्पा यांचे दर्शन घेतले आहे. काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने १० ते ५० वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखले जाऊ शकत नाही, असा ऐतिहासिक निकाल दिला होता. या निर्णयानंतरही कालपर्यंत एकासुद्धा महिलेला अयप्पांचे दर्शन घेने शक्य झाले नव्हते.

BhagyaVivah Marathi Matrimonial

त्यानंतर अनेक महिला कार्यकर्त्यांनी आणि महिला सामाजिक संघटनांनी सुद्धा मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, तीव्र विरोधामुळे त्यांना प्रवेश देण्यात आला नव्हता. दरम्यान, केरळचे मुख्यमंत्री पी विजयन यांनी ज्या महिलांना दर्शन घ्यायचे आहे, त्यांना पोलिसांनी संरक्षण पुरवण्याचा आदेश जारी केला होता. दरम्यान, आज २ धाडसी महिलांनी पोलीस संरक्षणात मंदिरात जाऊन देव दर्शन केलं आहे. तर दुसरीकडे शुद्धिकरण विधीसाठी मंदिर समितीकडून दर्शन बंद करण्यात आले आहे. त्या २ महिलांनी प्रवेश केल्यामुळे मंदिर समितीकडून मंदिरात शुद्धिकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यावर सुद्धा टीका करण्यात येते आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x