27 July 2021 2:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

वडापावचं तेल जिरवण्यासाठी सर्वाधिक 'सामना'चा वापर : राष्ट्रवादी

मुंबई : सामना वृत्त पत्रातुन अजित पवारांवर टीका करताना त्यांचा उल्लेख दुतोंडी साप असा केला होता. त्याला प्रतिउत्तर म्हणून मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसने रात्री उशिरा सामना वृत्तपत्राची खिल्ली उडविणारी पोष्टरबाजी केली.

BhagyaVivah Marathi Matrimonial

राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई लावलेल्या बँनर वर खोचक टोला लगावला आहे. बॅनरवर लिहिताना म्हटलं आहे की, एका सर्वे नुसार, मुंबई मध्ये सामना हा सर्वात जास्त वडापावला असलेलं तेल दाबून काढण्यासाठी वापर केला जातो.

सामना वृत्त पत्रात अजित पवारांची तुलना शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या छिंदमशी करण्यात आली होती, त्यालाच आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून बॅनरबाजी करून उत्तर देण्यात आलं आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x