9 October 2024 2:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मालामाल करणार हा स्टॉक - Marathi News Gold Rate Today | खुशखबर! सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Marathi News Pension Life Certificate | डोअरस्टेप बँकिंग सर्विसच्या माध्यमातून जमा करा 'लाईफ सर्टिफिकेट', घरबसल्या होईल काम IPO GMP | पैसे तयार ठेवा, सर्वात मोठा IPO लाँच होतोय, ₹13720 मध्ये मिळेल 1 लॉट, संधी सोडू नका - Marathi News Singham Again Trailer | 'एक वचन के लिए वो लंका जलाने वाला है', 'सिंघम अगेन' मध्ये पाहायला मिळणार रामायणची झलक BEL Share Price | मल्टिबॅगर PSU BEL शेअर पुन्हा रॉकेट होणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News Aditya Birla Mutual Fund | म्युच्युअल फंड योजना असावी तर अशी, महिना 3200 बचतीवर मिळेल 1 कोटी रुपये परतावा
x

चंद्राबाबूंकडे जाण्याचं धाडस नाही झालं, पण मातोश्रीवर आत्मविश्वासाने गेले?

मुंबई : भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काल मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन तब्बल दोन तासाहून अधिक वेळ चर्चा केली. परंतु एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आणि ती म्हणजे जर भाजप नेतृत्वाला खरोखरच जुन्या मित्र पक्षासोबत पुन्हा मैत्रीपूर्ण संबंध जोडायचे होते तर तो प्रयत्नं टीडीपी सोबत म्हणजे चंद्राबाबूंना भेटून दुरावा दूर करण्याचा प्रयत्न का नाही झाला, जसा शिवसेनेसोबत अगदी सहज झाला?

जर मित्र पक्षांचा दुरावा लक्षात घेतला तर शिवसेना जवळ जवळ चार वर्षाहून अधिक काळ सत्तेत राहून भाजपवर रोज नवनवे आरोप करत होते. दोन्ही बाजूने अगदी टोकाच्या भूमिका आणि टीका होत असताना शिवसेनेने काही दिवसांपूर्वीच आगामी निवडणुका स्वतंत्र लढविण्याचा निर्धार केला होता. परंतु एक गोष्ट त्यांनी स्वतःच्या बाजूने काळजी घेत राखून ठेवली होती. ती म्हणजे शिवसेनेने एनडीए मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे सामान्य जनतेला दाखविण्यासाठी एक दरवाजा बंद तर केला, परंतु दुसरा दरवाजा भाजपसाठी उघडा ठेवला होता. तो दरवाजा होता एनडीएचा घटक पक्ष म्हणून, त्यामुळे भाजप नेतृत्वाला याची पूर्ण जाणीव होती की हे ना सत्तेतून बाहेर पडणार ना स्वतंत्र निवडणुका लढविणार.

त्याउलट टीडीपीचे भाजपसोबत संबंध इतके टोकाचे नव्हते जितके शिवसेनेचे होते. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या विषयाला भाजपने नकार दिला आणि चंद्रा बाबूंना कोणताही विलंब न लावता टीडीपीच्या मंत्र्यांना तडका फडकी राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आले. इतकच नाही तर त्यांनी २-३ दिवसात एनडीएमधून सुद्धा बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. चंद्रा बाबुंचा हा तेलुगू हिसकाच त्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत शक्ती देईल आणि भाजपसाठी डोकेदुखी ठरेल.

त्याउलट महाराष्ट्रात शिवसनेंकडे आणि शिवसेनेच्या नेतृत्वात चंद्रा बाबुंसारखा धाडसी निर्णय घेणाची धमकच नाही हे या आधी सुद्धा वारंवार सिद्ध झालं आहे. वारंवार अपमान सहन करून सुद्धा शिवसेना सत्ता का सोडत नाही हे न समजण्या इतका भाजप काही दूध खुळ्यांचा पक्ष नाही. त्यामुळे शिवसनेच्या सत्तेच्या आर्थिक नाड्या ह्या मुंबई महापालिका आणि विधानसभेत आहेत हे भाजपाला चांगलेच ज्ञात आहे. ते बाहेर पडले तर त्यांची आर्थिक रसदच संपुष्टात येईल आणि आगामी निवडणूका अधीकच कठीण होतील असे एक न अनेक मुद्दे भाजपला चांगले माहित होते.

त्यामुळे चंद्राबाबूंकडे भाजपच्या नेतृत्वाने जाण्याच धाडस सुद्धा केलं नाही. इतकच नाही तर काही दिवसांपूर्वी जेव्हा अमित शहा तिरुपतीच्या दर्शनासाठी आंध्र प्रदेश मध्ये गेले होते, तेव्हा त्यांच्या गाडीच्या ताफ्यावर टीडीपीच्या कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक केली होती. परंतु सत्तेला धुडकावून अनेक वेळा राजीनाम्याचे फुसके बार फोडणाऱ्या शिवसेनेकडे मात्र भाजपचे अध्यक्ष मोठ्या आत्मविश्वासाने गेले आणि त्यांचा आत्मविश्वास सार्थ ठरला. कारण त्यांच्या साठी मातोश्रीवर खास गुजराती मेन्यू तयार होता आणि स्वागताची जय्यत तयारी सुद्धा केली गेली होती.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x