29 May 2023 10:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Manipur Violence | अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये पुन्हा जातीय हिंसाचार, आतापर्यंत 79 जणांचा मृत्यू, आमदार-मंत्र्यांच्या घरावर हल्ले 50 Percent Commission | मोदींनी इव्हेन्ट केलेल्या मध्य प्रदेश उज्जैन 'महाकाल लोक' येथील महादेवाचे ६ पुतळे कोसळले, कॉट्रॅक्टर गुजरातचा निघाला Credit Card Reward Points | क्रेडिट कार्डवर तुमच्याकडून वर्षाला 10 हजार रुपये वसूल केले जातात, तुम्हाला ही ट्रिक माहित आहे? Property Knowledge | प्रॉपर्टी विकताना फक्त एवढीच रक्कम कॅशमध्ये घ्या, नाहीतर ही चूक किती महागात पडेल लक्षात घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या अल्पबचत योजनेत डबल फायदा, फक्त व्याजाचे 1.85 लाख रुपये मिळतील Numerology Horoscope | 29 मे 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | आजचे राशिभविष्य | 29 मे 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

शरद पवार आणि राज ठाकरेंची भेट, नेमकं निमित्त काय ?

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात सकाळीच मुंबईतील पेडर रोड येथील शरद पवारांच्या निवासस्थानी भेट झाली. या भेटीमागचं कारण गुलदस्त्यातच असले तरी राजकीय वर्तुळात वेगवेगळे कयास बांधण्यात येत आहेत.

शरद पवारांची त्यांची भेट घेण्यामागे नेमके कारण काय हे अजून कळू शकलेल नाही. परंतु राजकीय वर्तुळात अचानक ही घटना घडल्याने या भेटी मागचं नक्की कारण तरी काय हे जाणून घेण्यासाठी सर्वच पक्षात कमालीची उत्सुकता वाढली आहे.

मनसेने उद्या गुढीपाडव्यानिमित्त जाहीर सभेचं आयोजन करण्यात आले आहे. राज ठाकरेंची उद्या शिवतीर्थावर होणारी सभा ही सर्व विक्रम मोडीत काढेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या सभेला राज ठाकरे त्यांच्या शैलीत विद्यमान सरकारवर तुफान टीका करण्याची शक्यता आहे. पण त्या सभेच्या एक दिवस आधी ही भेट घडल्याने सर्वांनाच भेटीमागच्या नेमक्या कारणांची उत्सुकता आहे.

राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच शरद पवारांची महामुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीने टीआरपीचे विक्रम मोडले होते. परंतु त्या मुलाखतीतून राज ठाकरेंमधलं एक प्रगल्भ व्यक्तिमत्व महाराष्ट्राने अनुभवलं होत. राष्ट्रवादीचे ग्रामीण भागात प्राबल्य आहे तर राज ठाकरेंच्या मनसेची शहरी भागात मोठी ताकद असून काही दिवसांपासून मनसेला ग्रामीण भागातून आणि विशेष करून शेतकऱ्यांकडून प्रतिसाद वाढताना दिसत आहे.

या सर्व गोष्टी विचारात घेता ह्या भेटीला खूप महत्व प्राप्त झालं आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thakarey(78)#Sharad Pawar(427)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x