27 July 2024 7:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

नीरव मोदीची जमिन नगरमधील शेतकऱ्यांनी कब्जात घेतली

अहमदनगर : नगर जिल्ह्यात खंडाळा गावातील जमिनीवर काळी आई मुक्ती संग्रामचा नारा देत शेतकऱ्यांनी १२५ एकर जमीन कब्जात घेतली. त्यात त्यांना काही राजकीय व्यक्तींनी मदत केल्याचे वृत्त आहे.

पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आणि हिरे व्यापारी नीरव मोदी हा सध्या फरार असून त्याच्याच मालकीची शेकडो एकर जमीन नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात खंडाळा या गावात आहे. त्याच १२५ एकर जमिनीवर काळी आई मुक्ती संग्रामचा नारा देत शेतकऱ्यांनी कब्जात घेतली.

नीरव मोदींची तीच १२५ एकर जमीन ताब्यात घेऊन उद्यापासूनच ट्रॅक्टरने नांगरून शेती कसण्याचा निर्णय त्या शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्या जमिनीवर फायरस्टोन नावाच्या कंपनीचा ऊर्जा प्रकल्प असून आमच्याकडून अत्यंत कवडीमोल भावाने जमीन घेतल्याचा त्या शेतकऱ्यांचा आरोप आहे. ही १२५ एकर जमीन ताब्यात घेताना मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते.

ईडीने ही जमीन नीरव मोदींच्या घोटाळ्यानंतर ताब्यात घेतली होती. तरीही तिथे ऊर्जा प्रकल्प सुरु आहे, परंतु नीरव मोदी प्रकरण पूर्णपणे निर्णयापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत या जमिनीचा ताबा इडीकडेच म्हणजे अंमलबजावणी संचालनालयानाकडेच राहणार आहे. परंतु तीच जमीन शेतकऱ्यांनी कब्जात घेतल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे.

हॅशटॅग्स

#Nirav Modi(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x