26 April 2024 10:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Viral Video | इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवण्यासाठी चालत्या कारच्या डिक्कीत फोडले फटाके, मग दिवाळी पोलिस स्थानकात

Viral Video

Viral Video | प्रसिध्दी मिळवण्यासाठी आधी खूप मेहनत करावी लागते. त्यानंतर मिळालेले सुख, यश आणि प्रसिध्दी अनंतकाळासाठी असते. मात्र सध्याच्या सुगात प्रसिध्दीची व्याख्याच बदलली आहे. कोणतीही व्यक्ती कसलेही व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर अपलोड करतात. त्याला चांगले व्ह्यूव्ज आले आणि व्हिडीओ व्हायरल झाला की आपण प्रसिध्द होतो असे अनेक जण समजतात.

मग यासाठी कोण काय करेल आणि काय नाही याचा कोणताच अंदाज लावता येणार नाही. अशात दिवाळीत सर्वच जण फटाके फोडतात. मात्र प्रसिध्द होण्यासाठी काही महान भागांनी चक्क चालत्या बीएमडब्लू गाडीच्या डिक्कीत फटाके फोडले आहेत. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

मात्र त्यांनी केलेल्या या कृत्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेउन आता त्यांची पोलिस ठाण्यात चांगलिच दिवाळी सुरू झाली आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ हरीयाणा येथील आहे. येथे गुरुग्रामच्या तीन मित्रांनी हा व्हिडीओ बनवला. गुरूवारी डीएलएफ फेज ३ येथील पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या अटकेत असलेले तीन मित्र नकुल वय २६, कृष्णा वय २२ आणि जतीन वय २७ ही मुले आहेत. या तिघांनी काळ्या रंगाच्या बीएमडब्लू कारच्या डिक्कीत फकाटे उडवले. त्यांची कार शंकर चौकातून गोल्फ कोर्स रोडच्या दिशेन जात होती. असे दृश्य व्हिडीओत कैद झाले आहे. ही माहिती एसीपी प्रीतपाल सांगवान यांनी दिली आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी तात्काळ याची दखल घेतली. तसेच आरोपींना अटक केली. पोलिसांनी या विषयी अधीक माहिती देत सांगितले की, हे तिन्ही तरुण कार खरेदी विक्रीचे काम करतात. त्यांना इंस्टाग्रामवर त्यांचे फॉलोवर्स वाढवायचे होते. त्यांचा हा व्हिडीओ जास्तीत जास्त व्हायरल व्हावा म्हणून त्यांनी असे केले. यावेळी कृष्णा व्हिडीओ काढत होता आणि जतिन गाडी चालवत होता. पोलिसांनी यात त्यांच्या दोन्ही कार देखील ताब्यात घेतल्या आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Viral Video Firecrackers set off in cars for publicity and viral videos 29 October 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(161)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x