27 July 2024 10:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा HUDCO Share Price | मल्टिबॅगर शेअरसाठी BUY रेटिंग, कंपनीबाबत अपडेट आली, यापूर्वी 400% परतावा दिला
x

अनलॉक १.०: मंदिर आणि धार्मिक स्थळांसाठी केंद्राची नवी नियमावली

Central Govt, Religious Places, Temples

मुंबई, ५ जून: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. तब्बल दोन महिन्यांनंतर लॉकडाउन शिथिल करण्यास सुरूवात झाली आहे. केंद्र सरकारनं धार्मिक स्थळं, मॉल, हॉटेल खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी काही नियम व अटी सरकारकडून घालण्यात आल्या आहेत. या नियमांचे पालन याठिकाणी जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने करणं बंधनकारक आहे. मात्र ही सुविधा कन्टेंन्मेंट झोनसाठी पूर्णपणे बंद आहे.

हॉटेल खुली करण्याची परवानगी देतानाच सरकारनं कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काही महत्त्वाचे नियम घातले आहेत. यात ग्राहकाने स्वतःच्या मेडिकल व ट्रॅव्हल हिस्ट्रीची माहिती देणं अनिवार्य केलं आहे.

धार्मिक स्थळ, मॉल्स आणि रेस्टॉरंटमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा असते त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका जास्त आहे. त्यापार्श्वभूमीवर या सर्व ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं बंधनकारक असल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

कंटेनमेंट झोनमध्ये मॉल्स, धार्मिक स्थळं, रेस्टॉरंट किंवा हॉटेल्स बंदच राहणार आहेत. या ठिकाणी अद्याप उघडण्याची परवानगी देण्यात आली नाही. मात्र कंटेनमेंट झोन वगळता इतर ठिकाणी सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. केंद्र सरकारनं नवी नियमावली जाहीर केली त्यात काय म्हटलं आहे पाहा.

मॉल्ससाठी काय आहे नवी नियमावली

  • प्रवेशद्वारावर हॅण्ड सॅनिटायझर आणि थर्मल स्कॅनिंग अत्यावश्यक. थर्मल स्कॅनिंगनंतर कोरोनाची लक्षणं नसणाऱ्यांनाच प्रवेश द्यावा.
  • पार्किंग आणि मॉलच्या परिसरात सुरक्षित अंतर राखणं अनिवार्य आहे.
  • लिफ्ट आणि एक्सलेटरवरून जाताना सोशल डिस्टन्सचं पालन करणं बंधनकारक आहे. एक्सलेटरवर एक पायरी सोडून उभं राहावं.
  • मॉल्समधील गेमिंग सेक्शन, चित्रपटगृह बंद राहणार आहेत. रेस्टॉरंट आणि खाद्य पदार्थांचे कॉर्नर असल्यास केवळ 50 टक्के नागरिक सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून बसतील अशी व्यवस्था करावी.

 

News English Summary: Religious places, malls and restaurants are frequented by a large number of citizens, so the risk of corona infection is high. In this context, the Central Government has stated that it is mandatory to observe social distance in all these places.

News English Title: Central Government has stated that it is mandatory to observe social distance in all Religious places unlock News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x