19 January 2025 6:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch BEL Share Price | डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज बुलिश - NSE: BEL Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला तुफान गर्दी, 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट, श्रीमंत करणार हा शेअर - Penny Stocks 2025 SBI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपये SIP वर मिळेल 1.26 कोटी रुपये परतावा IREDA Share Price | आता नाही थांबणार, इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या
x

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज वादळग्रस्त रायगडच्या दौऱ्यावर

Raigad, Ratnagiri, Konkan, Nature Cyclone, CM Uddhav Thackeray

मुंबई, ५ जून: कोकणात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रायगड जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. त्यामुळे चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या कोकणातील जिल्ह्यांसाठी सरकारकडून आर्थिक पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आता वर्तविली जात आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर वित्तहानी झाली आहे. दापोली, मंडणगड, श्रीवर्धन, अलिबाग या भागांना चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे.

अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. तर ५ हेक्टरवरील कृषीक्षेत्राला फटका बसला आहे. याशिवाय, चक्रीवादळानंतर बहुतांश भागातील वीज आण दूरध्वनी यंत्रणा अजूनही ठप्प आहे. शहरी भागातील वीज पुरवठा पुर्ववत करण्याची कामे सुरु करण्यात आली असली तरी ग्रामीण भागात फार मोठ्या प्रमाणात कामे करावी लागणार आहे. यासाठी महावितरणला मनुष्यबळाची आवश्यकता आहे.

दरम्यान, या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रायगड जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ते आढावा बैठक घेतील. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि पालकमंत्री आदिती तटकरे यादेखील उपस्थित असणार आहेत.

निसर्ग चक्रीवादळ रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीवर बुधवारी धडकले होते. याचा फटका जिल्ह्यातील १२ तालुक्यांना बसला असून वादळात दोघांचा मृत्यू झाला. तर अनेक जणांचे संसार उघड्यावर आले. वीजपुरवठा खंडीत झाल्याने जिल्ह्यातील बहुतांश भाग अंधारात आहे. तसेच दूरसंचार यंत्रणा कोलमडल्या आहेत, लाखो झाडे उन्मळून पडल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. या चक्रीवादळात जवळपास ५ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील फळबागा उध्वस्त झाल्या, तर ५ लाखाहून अधिक घरांचे नुकसान झाले. या सर्व परिस्थितीचा आज मुख्यमंत्री आढावा घेणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मुंबईहून सकाळी साडे अकराच्या सुमारास रोरो बोटीने अलिबागला जाणार आहेत.

 

News English Summary: On Friday, Chief Minister Uddhav Thackeray will visit Raigad district to take stock of the damage caused by the cyclone. Therefore, it is being speculated that the government will announce a financial package for the cyclone-hit districts of Konkan.

News English Title: Chief Minister Uddhav Thackeray will visit Raigad district to take stock of the damage caused by the Nature cyclone News Latest Updates.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x