मुंबई, ४ डिसेंबर: राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणुक पार पडली. यात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. तर शिवसेनेला आणि भारतीय जनता पक्षाला हार पत्करावी लागली आहे. यावरुन राजकीय वर्तृळात अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. एकीकडे राषअट्रवादी आणि कॉंग्रेस जल्लोष करत आङेत तर दुसरीकडे भाजप हार झाल्याने पुढे काय या प्रश्नात आहेत. दरम्यान, भारतीय जनता पक्षाने जरी स्वत:ची हार स्वीकारली असली तरी शिवसेनेला आणि ठाकरे सरकारला टोला लगावणे बंद केले नाही आहे.
भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. नितेश राणे यांनी शुक्रवारी ट्विट करत पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचा पराभव मान्य केला. ठीक आहे आम्ही कमी पडलो. पण मुख्यमंत्री असलेल्या पक्षाला भोपळाही फोडता आली नाही. मित्रपक्षांनीच शिवसेनेच्या मृत्यूचा सापळा रचला आहे. बाकी मैदानात परत भेटूच, असे नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या गोटातून नितेश राणे यांच्या या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहावे लागेल.
ठीक आहे आम्ही कमी पडलो!
पण ज्यांचा मुख्यमंत्री त्यांना भोपळा..
मित्र पक्षानीच रचला मृत्यूचा सापळा..
बाकी मैदानात परत भेटूच !!— nitesh rane (@NiteshNRane) December 4, 2020
News English Summary: Bharatiya Janata Party MLA Nitesh Rane has targeted the Mahavikas Aghadi government. Nitesh Rane tweeted on Friday acknowledging the BJP’s defeat in the graduate and teacher constituencies. Well we fell short. But the party with the chief minister could not blow a zero.
News English Title: BJP MLA Nitesh Rane slams Shivsena Party after MLC Election result news updates.
