7 October 2022 6:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apple iPhone 14 Plus | ॲपल आयफोन 14 प्लसची आज विक्री सुरू, किंमत आणि फीचर्ससह सर्व डिटेल्स चेक करा Numerology Horoscope | 08 ऑक्टोबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Penny Stocks | या 18 रुपयाच्या शेअरने 170 टक्क्यांचा मल्टीबॅगर परतावा दिला, ता 1 शेअरवर 5 फ्री बोनस शेअर्स मिळणार, स्टॉक नेम नोट करा Dry Brushing  | डेड स्किन काढून त्वचा बनवा चमकदार, घरीच करा ड्राय ब्रशिंग, या टिप्स फॉलो करा शिंदेंची सभा फ्लॉप तर शिवाजीपार्कची सभा गाजल्याचे माध्यमांवर दिसल्याने भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांचा जळफळाट?, भावनिक टिपण्या सुरु Mutual Funds | टॉप 10 म्युच्युअल फंड योजना ज्या गुंतवणूकदारांचा पैसा वेगाने वाढवत आहेत, त्या फंडाच्या योजना आणि यादी सेव्ह करा Penny Stocks | गुंतवणूकदारांसाठी लाईफ चेंजर ठरला हा 2 रुपयाचा शेअर, 1 लाखावर तब्बल 7 कोटी परतावा, स्टॉकबद्दल जाणून घ्या
x

आदित्य ठाकरे आणि रोहित पवार सुरवातीच्या फेऱ्यांमध्ये आघाडीवर

Rohit Pawar, Aaditya Thackeray

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी सारी तयारी पूर्ण झाली असून, सुमारे २५ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मतमोजणीच्या कामाकरिता नेमणूक करण्यात आली आहे. आज दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व कौल हाती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महायुती की आघाडीची सत्ता येणार हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. निकालाचा पहिला कल महायुतीच्या बाजूने लागला आहे. जवळपास १०० च्या वर महायुतीने आघाडी घेतली आहे तर महाआघाडी ४० जागांच्या वर आलेली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे ठाकरे-पवार घराण्यातील नवीन पिढी यंदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरली आहे.

वरळीत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे आघाडीवर आहेत. वरळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश माने यांच्याशी त्यांचा थेट सामना होत आहे. ठाकरे कुटुंबातील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले ते पहिले ठाकरे आहेत. दरम्यान, परळीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे १ हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्यासमोर भाजपाच्या विद्यमान आमदार पंकजा मुंडे यांचं आव्हान आहे. भावनिक राजकारणामुळे या मतदारसंघात निवडणूक अतिशय चुरशीची ठरली होती.

हॅशटॅग्स

#Aditya Thakarey(103)#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x