1 October 2020 5:53 AM
अँप डाउनलोड

यवतमाळ: पंचायत समितीच्या सभापती निवडीवरून सेना-भाजप नेत्यांमध्ये राडा

ZP Election Yavatmal, Shivsena, BJP

यवतमाळ: यवतमाळ पंचायत समिती सभापती निवडीवरून बुधवारी शिवसेना-भाजप नेत्यांमध्ये राडा झाला. पंचायत समिती कार्यालयात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाची महाविकास आघाडी आहे. यवतमाळ पंचायत समिती सभापती उपसभापती पदासाठी आज निवडणूक होती.

BhagyaVivah Marathi Matrimonial

शिवसेनेचे एक महिला सदस्य नंदा लडके या भाजपच्या गोटात गेल्याने पंचायत समिती परिसरात चांगलाच गदारोळ झाला. यावेळी महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्याम जस्वाल आणि शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड या पदाधिकाऱ्यांत धक्काबुक्कीही झाली. यावेळी पंचायत समिती सदस्य नंदा लडके यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. महाविकास आघाडीविरुद्ध भारतीय जनता पक्ष सामना रंगला होता. शिवसेना 4, भारतीय जनता पक्ष 2, काँग्रेस १, राष्ट्रवादी काँग्रेस १ असे पंचायत समिती सदस्य आहेत.

बुधवारी निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी शिवसेनेच्या त्या महिलेला घेऊन पंचायत समितीच्या आवारात येताच राडा झाला. शिवसेना कार्यकर्त्यांनी त्या महिलेला जाब विचारला. याच कारणावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच झुंपली. दोन्ही पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की, शिवीगाळ व रेटारेटी झाली.

राष्ट्रवादीचे सदस्य नरेश ठाकूर हे भारतीय जनता पक्षावासी झाले. तर शिवसेनेच्या नंदाबाई लडके या देखील भारतीय जनता पक्षाच्या गोटात सामील झाल्या. दरम्यान हाती आलेल्या वृत्तानुसार, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्याम जयस्वाल गट आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड या नेत्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं पाहायला मिळालं. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना शांत केलं.

 

Web Title:  ZP Election shivsena Yavatmal clashes between Shivsena and BJP Party workers.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Shivsena(926)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x