16 December 2024 3:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

नाशिकमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना डॉक्टरांकडून टाळाटाळ, पवारांकडून चिंता व्यक्त

NCP President Sharad Pawar, Private Hospitals, Doctors

नाशिक, २४ जुलै : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूरनंतर आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. नाशिक जिल्ह्यातही करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येनं झाला असून, प्रसार नियंत्रणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा पवारांनी आढावा घेतला. शहरातील रुग्णसंख्या वाढत असताना डॉक्टरांकडून टाळाटाळ केली जात आहे. यावर चिंता व्यक्त करत पवार यांनी डॉक्टरांनाही इशारा दिला.

शरद पवार यांनी आज नाशिक जिल्ह्याचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ही आढावा बैठक पार पडली. या बैठकीला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. आढावा घेतल्यानंतर पवार यांनी पत्रकार परिषदेतून माध्यमांशी संवाद साधला.

पुढे बोलताना पवार म्हणाले की, त्यांनी कोरोनाच्या संकटात राजकारण करू नये, असं आवाहन केलं. ‘महाराष्ट्राच्या जनतेचं आम्ही सगळे देणं लागतो. अशावेळी राजकीय मतभेद, मतभिन्ना न आणता जे काही करता येईल ते करावं. देवेंद्र फडणवीस यांनीही या कामात लक्ष घालावं, अशी आमची अपेक्षा आहे,’ असं वक्तव्य शरद पवारांनी केलं.

देशाच्या तुलनेत मुंबई, कल्याण-डोंबिवली, नाशिक, कोल्हापूर, अकोला आणि औरंगाबादमध्ये संख्या वाढत आहे. मुंबईचं चित्र दुरूस्त होत आहे. या सगळ्या जिल्ह्यात पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री बैठका घेत आहोत. मुख्यमंत्री येणार होते, मात्र आम्ही या जिल्ह्यात जाऊन आढावा घेऊ आणि त्यांना याबाबत माहिती देऊ, म्हणजे पुढील निर्णय घेता येईल,’ अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली.

 

News English Summary: After Solapur, NCP President Sharad Pawar is on a tour of Nashik today. A large number of corona outbreaks have also occurred in Nashik district and Pawar reviewed the measures being taken to control the spread.

News English Title: NCP President Sharad Pawar Warns To Private Hospitals And Doctors News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x