5 May 2024 12:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

कायदा चुकीचा नाही | कायद्यातील त्रुटी चुकीच्या | त्याचा फायदा २-३ जणांना होऊ नये

MNS Chief Raj Thackeray, Farmers protest, Farm Laws

मुंबई, ०६ फेब्रुवारी: राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलनाला आता जवळपास अडीच महिन्याचा कालावधी होत आहे. सरकारसोबत झालेल्या अनेक बैठकांनतरही नवीन कृषी कायदा मागे घेण्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. या आंदोलनात ६० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच केंद्र सरकारसोबत अनेक बैठक देखील पार पडल्या आहेत, ज्यामार्गे कोणताही तोडगा निघालेला नाही.

संयुक्त किसान मोर्चा संघटनेकडून आधी घोषित केल्यानुसार आज ‘चक्का जाम’ करण्यात आला. आज दुपारी 12 ते 3 या वेळेत हे देशव्यापी आंदोलन केलं गेलं. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सांगितलं होते की, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये चक्‍का जाम होणार नाही, मात्र या दोन्ही राज्यांमध्ये एक लाख शेतकरी स्टॅंडबायमध्ये असतील. राकेश टिकैत म्हणाले होते की, “चक्का जाम वापस घेतलेला नाही. मात्र या कार्यक्रमात थोडा बदल केला आहे.

दरम्यान, याच शेतकरी आंदोलनावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्याचं मत व्यक्त केलं आहे. टिकरी, सिंघू आणि गाझीपूर येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची नाकेबंदी केंद्र सरकारनं केली असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत सरकारला सुनावलं आहे. मोदी सरकारने आणलेलय नव्या कृषी कायद्यांपेक्षा या कायद्यातील तरतुदी चुकीच्या असल्याचं मत त्यांनी मांडलं आहे. तसेच या कायद्याचा फायदा काही मोजक्या लोकांना होऊ नये असं देखील म्हटलं आहे.

पुढे राज ठाकरे म्हणाले, “मला असं वाटतं हे फारच चिघळलं आहे. आम्ही हे सगळं पाहतो आहोत. शेतकऱ्यांच्या मागे कोण आहेत… त्यांना पैसे कुठून येतायेत वगैरे. सरकारनं जो कायदा आणला आहे, तो कायदा चुकीचा नाही. पण, केंद्राने राज्यांचा विचार करून, राज्यांशी चर्चा करून याची अंमलबजावणी केली पाहिजे. शेवटी प्रत्येक राज्यामध्ये कृषी खातं आहे. प्रत्येक राज्याची कृषी धोरणं वेगळी आहे. प्रत्येक राज्याच्या कृषी मंत्री वा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घ्यायला पाहिजे होतं. हे प्रकरण इतकं चिघळायची गरज नव्हती. चीनच्या वा पाकिस्तानच्या सीमेवरही मी इतका बंदोबस्त बघितला नाही. इतका बंदोबस्त शेतकऱ्यांसाठी करण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या मागण्या समजून घेतल्या पाहिजे,” असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

 

News English Summary: MNS chief Raj Thackeray has expressed his views on the farmers’ agitation. The agitating farmers in Tikri, Singhu and Ghazipur have been blocked by the central government and Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray has expressed his displeasure to the government. He has opined that the provisions of this law are more wrong than the new agricultural laws brought by the Modi government. He also said that few people should benefit from this law.

News English Title: MNS Chief Raj Thackeray opinion on Farmers protest news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x