15 December 2024 5:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये
x

मृत्यू झालेल्या माणसाच्या वारसांना नोकरी, मदत देण्यासाठी किशोर वाघ यांनी लाच घेतली, हे तुम्ही जनतेला सांगा

Chitra Wagh

मुंबई, ०७ सप्टेंबर | राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख आणि भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यातील शाब्दिक युद्ध आता सुरुच आहे. कालच्या संघर्षानंतर चित्रा वाघ यांनी आज पुन्हा ट्विट करुन महेबूब शेख यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यांच्या टीकेला महेबूब शेख यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. “असल्या 56 चित्रा वाघ आल्या तरी मला फरक पडत नाही आणि असल्या मांजरीला आणि बोक्यांना मी घाबरत नाही”, असा पलटवार महेबूब शेख यांनी केलाय.

मृत्यू झालेल्या माणसाच्या वारसांना नोकरी, मदत देण्यासाठी किशोर वाघ यांनी लाच घेतली, हे तुम्ही जनतेला सांगा – NCP leader Mehabub Shaikh again target BJP leader Chitra Wagh over Kisshor Wagh corruption case :

चित्रा वाघ यांनी पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यावर टीका केली होती. मेहबूब शेख पारनेर दौऱ्यावर असताना त्यांनी चित्रा वाघ यांना ‘लाचखोर नवऱ्याची बायको’ म्हणत ‘आधी नवऱ्याला नीतिमत्ता शिकवा, मग आम्हाला शिकवा’, असा सल्ला चित्रा वाघ यांना दिला होता. त्यानंतर चित्रा वाघ आणि मेहबूब शेख यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगलं आहे.

तुम्ही काहीही म्हटलं तरी तुमची ओळख लाचखोर नवऱ्याची बायको हीच आहे. लाचखोर नवऱ्याच्या बायकोचं नाव वाघ असल्यामुळे मांजर वाघ होत नाही. आपल्या नवऱ्याने कशात आणि कोणत्या प्रसंगात लाच घेतली यावर अधिक स्पष्टपणे तुम्ही बोला”, असं मेहबूब शेख चित्रा वाघ यांना उद्देशून म्हणाले. “मेलेल्या माणसाच्या वारसांना नोकरी आणि मदत देण्यासाठी किशोर वाघ यांनी लाच घेतली, हे तुम्ही राज्यातील जनतेला सांगा”, असंही महेबूब शेख म्हणाले.

माझा मुलगा रोज खोटारड्या वाघाशी खेळतो
“त्या स्वत:ला वाघ म्हणवतात. पण मांजर वाघ होत नसते. असल्या खोटारड्या वाघासोबत माझा मुलगा रोज खेळत असतो. चित्रा वाघ काय आहेत हे मला नीट माहिती आहे. त्यांची बरीच प्रकरणं मी बाहेर काढणार आहे”, असा इशाराही महेबूब शेख यांनी दिला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: NCP leader Mehabub Shaikh again target BJP leader Chitra Wagh over Kisshor Wagh corruption case.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x