15 March 2025 5:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 16 मार्च 2025, कसा असेल तुमच्यासाठी रविवारचा दिवस, तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 16 मार्च रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | स्वस्तात खरेदी करा डिफेन्स कंपनीचा शेअर, तज्ज्ञांचा सल्ला, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: BEL Suzlon Share Price | मल्टिबॅगर एनर्जी स्टॉकमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राईससह BUY रेटिंग जाहीर - NSE: SUZLON Bonus Share News l खुशखबर, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका, पोर्टफोलिओ मजबूत करा TATA Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, मिळेल मोठा परतावा - NSE: TATAMOTORS IRB Infra Share Price | शेअर प्राईस 42 रुपये, शेअरमध्ये 56% अपसाईड तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: IRB
x

शिंदे गटातील मंत्र्यांना सत्तेचा माज! पोलिसांसमोर खुलेआम दोघांना शिवीगाळ-मारहाण, गृहमंत्री बघ्याच्या भूमिकेत

Minister Dada Bhuse

Minister Dada Bhuse | हिळावी अधिवेशनाचा पहिला आठवडा संपला असून सोमवारपासून शेवटच्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. शेवटच्या टप्प्यात विरोधक आक्रमक झाले असून आता उद्धव ठाकरेही मैदानात उतरले आहेत. आजच्या दिवशी मंत्री अब्दुल सत्तार, संजय राठोड आणि सीमावाद प्रकरण चांगलं तापणार असल्याचे दिसत आहे. विरोधकांचं आज वेगळं रूप विधान भवनाच्या परिसरात पाहायला मिळाले. टाळ वाजवत भजन म्हणत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे. त्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

एकाबाजूला, राज्यातील शिंदे सरकारमधील काही मंत्री वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत. आता शिंदेच्या कॅबिनेटमधील आणखी एका मंत्र्याचा एक वादग्रस्त व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये काय?
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असे दिसून येत आहे की, मंत्री दादा भुसे हे दोन तरुणांना शिव्या देत असून त्यात त्यांनी एका तरुणाच्या कानाखाली मारली आहे. त्यामुळं आता राष्ट्रवादीनं हा व्हिडिओ शेयर करत मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केली आहे. याशिवाय हिवाळी अधिवेशनातही या विषयारून विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याची शक्यता आहे. परंतु हा व्हिडिओ नेमका कधीचा आणि कुठला आहे, हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही. तसेच दादा भुसेंनी या तरुणांना नेमकी का मारहाण केली, याची माहितीही अद्याप समोर आलेली नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Cabinet Minister Dada Bhuse abusing and beating 2 youngsters check details on 27 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Minister Dada Bhuse(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x