12 December 2024 5:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

हे काँग्रेसवाले गावातील गरिबांकडे जातात | त्यांच्याकडे जेवतात, फोटो काढतात - नरेंद्र मोदी

Union Minister Amit Shah, West Bengal assembly Election, lunch strategy, Villagers home

कोलकत्ता, २० डिसेंबर: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही प.बंगालकडे आपला मोर्चा वळवला आहे. नव्या वर्षापासून अमित शहा प्रत्येक महिन्यातील एक आठवडा प.बंगालमध्ये ठाण मांडून असणार आहेत. यात शहा निवडणुकीचा घटनाक्रम, प्रचार, रणनितीवर स्वत: जातीनं लक्ष देणार आहेत.

प.बंगालमध्ये पुढील वर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा कार्यकाळ २६ मे २०२१ रोजी संपुष्टात येणार आहे. त्याआधी निवडणूक आयोगाला निवडणुकीचा कार्यक्रम घ्यावा लागणार आहे. या दौऱ्यात अमित शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये आदिवासींच्या घरी जेवण करण्याची रणनीती आहे. आज दुपारी 1.15 वाजता बालीजुडी गावातील आदिवासी शेतकरी सनातन सिंह यांच्या घरी जाऊन त्यांनी जेवण केलं. यापूर्वी मध्य प्रदेश आणि इतर राज्यातील निवडणुकीतही अमित शाह यांनी गावातील गरिबांच्या झोपडीत जाऊन जेवण करण्याची रणनीती अमलात आणली आहे.

गेल्यमहिन्यात देखील अमित शाह पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर होते. अमित शहा यांनी त्या दौऱ्यात एका आदिवासी घरातील जेवणाचा आस्वाद घेतला होता. यावर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी टीका केली होती. त्यांनी म्हटलं होतं की अमित शहा यांचं हे भोजन म्हणजे ‘दिखावा’ आहे. तसेच ते जेवण फाईव्ह स्टार हॉटेलमधून आणलेलं होतं तसेच अमित शहांनी एक ब्राह्मण देखील आणला होता. पश्चिम बंगालमधील बांकूरा जिल्ह्यातील खत्रा गावात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.

मात्र निवडणुका आल्या की गावातील गरिबांच्या घरी जाऊन जमिनीवर बसून भोजन करणं आणि तिथे फोटो क्लिक करणं हे यावरून भारतीय जनता पक्षच तोंडघशी पडला आहे आणि तो देखील नरेंद्र मोदी यांच्या जुन्या ट्विटमुळे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मधील निवडणुकीवेळी काँग्रेसला लक्ष करताना म्हटलं होतं की, “काँग्रेसचे नेते दारिद्र्य पर्यटनात माहीर आहेत. कॅमेरे घेऊन ते गावांमध्ये जातात, गरिबांसोबत बसतात, त्यांचं जेवण जेवतात आणि फोटो काढतात. मात्र आज नेमकं तेच तंतोतंत भाजपचे नेते अमित शाह करत आहेत. म्हणजे अमित शाह दारिद्र्य पर्यटनात माहीर आहेत. कॅमेरे घेऊन ते गावांमध्ये जातात, गरिबांसोबत बसतात, त्यांचं जेवण जेवतात आणि फोटो काढतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

 

News English Summary: Congress leaders specialise in poverty tourism. With cameras, they go to villages, sit with the poor, eat their food & get pictures clicked said Prime Minister Narendra Modi in April 2014.

News English Title: Union Minister Amit Shah West Bengal assembly Election lunch strategy in villagers home news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x