15 December 2024 4:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा
x

शेलारांना माहीत नसावं, भाजपचे प्रवक्ते वेरिफाइड अकाऊंटवरून असे फेक व्हिडिओ शेअर करतात

Narendra Modi, Raj Thackeray, Ashish Shelar

मुंबई : आज मुंबईमध्ये आशिष शेलार यांनी राज ठाकरेंच्या व्हीडीओ आरोपांना प्रतिउत्तर देण्यासाठी जे काही दाखवलं त्यातील अनेक गोष्टी या हास्यास्पद होत्या. मुळात वेरिफाइड अकाउंट कोणाला मिळत याचे फेसबुक व ट्विटरने काही नियम आखले आहेत आणि अकाउंट वेरिफाइड करण्यासाठी संबंधिताला पुरावे देखील द्यावे लागतात. मुळात सामान्य वापरकर्त्याला फेसबुक किंवा ट्विटर अकाउंट वेरीफाईड करता येत नाही. अगदी अनेक पत्रकार, समाज सेवक आणि सामाजिक संस्था देखील आज अन वेरिफाइड अकाउंट वापरतात. त्यात मागील वर्षभरापासून फेसबुक व ट्विटरने भारतात अकाउंट वेरीफाईड करण्याची प्रक्रिया तात्पुरती स्थगित केली आहे.

जर विषय केवळ अकाउंट वेरिफाइड असण्यावरून शेअर केलेली गोष्ट योग्य आहे असं म्हटलं तर अनेक विरोधी पक्षांनी मोदींशी संबंधित व्हिडिओ शेअर केले आहेत, जे त्यांच्या वेरीफाईड अकाऊंटवरून शेअर करण्यात आले होते. म्हणजे अगदी पीएनबी घोटाळ्यातील आरोप मेहुल चोक्सी हा देशातून पलायन करण्यापूर्वी मोदींसोबत एका कार्यक्रम हजर होता आणि मोदी त्याला सर्वांसमोर मेहुलभाई म्हणाले होते आणि विशेष म्हणजे त्यावेळी पहिल्या रांगेत स्वतः आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराजाने देखील तेथे उपस्थित होते.

मुख्य व्हिडिओमध्ये मोडतोड करून फेक व्हिडिओ बनविणे आणि ते वायरल करणे हे समाज माध्यमांवर नित्याचच झालं आहे. मात्र आशिष शेलार यांना यांची कल्पना आहे का, भाजपच्या एक नाही तर अनेक नेते मंडळींनी त्यांच्या अन-वेरिफाइड अकाऊंटवरून छेडछाड केलेले व्हिडिओ शेअर केले होते. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर भाजपचे आमदार आणि प्रवक्ते पदावर असलेली जवाबदार व्यक्ती खोट्या गोष्टी समाज माध्यमांवर वायरल करते याची आशिष शेलार यांना कल्पना आहे का?

आमदार राम कदम यांनी अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकपूर्व प्रचारा दरम्यानचा एक विडिओ ट्विट केला होता. परंतु केवळ आमदारच नाही तर भाजप प्रवक्ते पदावर असलेल्या राम कदमांनी कोणतीही शहानिशा न करता मोडतोड केलेला विडिओ शेअर केला होता. वास्तव हे आहे की तो लहान मुलगा मोदी नव्हे तर डोनाल्ड ट्रम्प’च बोलला होता. मात्र असे फेक व्हिडिओ भाजपच्या अनेक नेतेमंडळींनी त्यांच्या वेरिफाइड अकाऊंटवरून मागील अनेक वर्ष व्हायरल केले आहेत. त्यात भर म्हणजे ज्या अन-वेरिफाइड अकाऊंटवरून ते बोंबाबोंब करत आहेत, त्याच लवारीस अन-वेरिफाइड अकाऊंटवरून भाजपचे नेते त्यांचं वेरीफाईड अकाउंट वापरून फेक व्हिडिओ शेअर करत आहेत. विशेष म्हणजे ते शेअर केल्यानंतर त्यात थेट देशाच्या पंतप्रधानांना आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देखील मेन्शन करतात.

त्या ट्विट मध्ये राम कदम यांनी म्हटलं आहे की, “एक विलक्षण भाषण केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लहान मुलाला विचारलं की ‘तुला सर्वाधिक कोण आवडत?’ ट्रम्प यांना वाटलं लहान मुलगा ट्रम्प बोलेल. परंतु व्हिडिओ पहा… त्या निरागस लहान मुलाने काय उत्तर दिल… ट्रम्प यांना धक्काच बसला….हा व्हिडिओ BBC न्यूज’वर खूप सुपरहिट होत आहे.

आमदार राम कदम यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा ट्विट केलेला फेक व्हिडिओ;

आणि हा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा व्हिडिओ

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x