23 September 2019 11:17 AM
अँप डाउनलोड

लोकांना केवळ स्वप्नं दाखवणारा नेता चांगला वाटतो!....गडकरींचा हा टोला कोणाला?

मुंबई : मागे काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या रोखठोक वक्तव्यातून भारतीय जनता पक्षाने २०१४ मध्ये हेतु पुरस्कर जाहीर खोटी आश्वासने सामान्यांना दिल्याचे अप्रत्यक्षरित्या मान्य केले होते. कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्ष देशात सत्तेवर येणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री होती. त्यामुळेच विचाराअंती आम्हाला जाहीर खोटी आणि मोठमोठी आश्वासने देण्याचा सल्ला देण्यात आला होता. परंतु, आता जेव्हा कधी आम्ही देशात सत्तेत आलो आहोत, तर सामान्य जनता आम्हाला दिलेल्या खोट्या आश्वासनांची बरोबर आठवण करून देत आहेत. परंतु, आम्ही केवळ त्यांना एक स्मित हास्य देतो आणि पुढे चालत राहतो, असे त्यांनी जाहीरपणे एका कार्यक्रमादरम्यान म्हटले होते. त्यानंतर त्यांच्यावर प्रचंड टीका झाल्यानंतर त्यांच्यवर पुन्हा स्वतःच्या वक्तव्यावर खुलासा करण्याची वेळ आली होती.

दरम्यान आजच्या एका कार्यक्रमात पुन्हा नितीन गडकरी म्हणाले, ‘नेहमी स्वप्नं दाखवणारा नेता लोकांना चांगला वाटतो. परंतु, दाखवलेले स्वप्नं पूर्ण केली नाहीत तर लोक त्यांना मारतात सुद्धा. त्यामुळे स्वप्नं तीच दाखवा जी पूर्ण होऊ शकतात. मी स्वप्नं दाखवणाऱ्या नेत्यांपैकी नाही. मला कोणताही पत्रकार त्यावर विचारू शकत नाही. कारण मी जे बोलतो, ते शंभर टक्के पूर्ण करतो. विशेष म्हणजे नितीन गडकरी जेव्हा हे सर्व मंचावर बोलत होते, तेव्हा उपस्थितांनी सुद्धा त्यांना हसून दिल्याचे पाहायला मिळाले.

मराठी विवाह II अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

हॅशटॅग्स

#Narendra Modi(981)#Nitin Gadkari(46)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या