14 December 2024 2:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा
x

नाशिक प्रवेशद्वार; तत्कालीन प्रकल्प मनसेचा, त्यावर जल्लोष भाजपचा? सविस्तर

नाशिक : फडणवीसांच्या भाजपने दत्तक घेतलेल्या नाशिकमध्ये अजून एका स्मार्ट जल्लोषाची तयारी सुरु केल्याचे वृत्त आहे. याआधी सुद्धा स्मार्ट सिटीच्या नावाने मनसेच्या सत्ताकाळातील प्रकल्प स्वतःचे असल्याचे भास निर्माण करणारी ‘स्मार्ट’ नाशिक भाजप अजून एका स्मार्ट प्रदर्शनाच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.

कारण, मुंबईकडून नाशिकमध्ये आल्यावर विल्होळीजवळील प्रवेशद्वारावर हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड अर्थात HAL’कडून ‘मिग-२१’ आणि ‘मिग-२९’ या मूळ रशियन बनावटीच्या लढाऊ विमानांच्या प्रतिकृती उभारण्याचे काम आता अंतिम टप्यात आले आहे. पुढच्या आठवड्यात याच प्रतिकृती नाशिक महानगरपालिकेच्या स्वाधीन केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी जोरदार उदघाटनाची तयारी सुरु केल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, तत्पूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नाशिक महानगर पालिकेत सत्ता असताना त्यांनी खासगीकरणातून शहराच्या सौंदर्यवाडीकडे अधिक लक्ष केंद्रित केले होते. त्यावेळीच नाशिक शहराचे स्वतःचे भव्य प्रवेशद्वार असावे अशी संकल्पना मांडली होती. एचएएल हा लढाऊ विमानांची निर्मिती करणारा प्रकल्प नाशिक शहराची मोठी ओळख असल्याने शहराच्या प्रवेशद्वारावरच अशा लढाऊ विमानांच्या प्रतिकृती लावण्याची मूळ संकल्पना राज ठाकरे यांनी मांडली होती. तब्बल २ कोटी ३४ लाख खर्चून विल्होळीलगत जुन्या जकात नाक्याच्या जागेत भव्य प्रवेशद्वाराची उभारणी आता अंतिम टप्यात आली आहे.

दरम्यान, एचएएल’चेही आर्थिक सहकार्य यासाठी लाभले असून त्यांनी सीएसआर फंडातुन २५ लाख रुपये सदर प्रकल्पासाठी दिले आहेत. तसेच नाशिक शहराच्या प्रवेशद्वारावर ‘मिग-२१’ आणि ‘मिग-२९’ या मूळ रशियन बनावटीच्या लढाऊ विमानांच्या प्रतिकृती सुद्धा हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड देणार आहे. तसेच या प्रवेशद्वारासाठी सिव्हिल वर्क, शोभिवंत वनस्पतीची लागवड, रोड वर्क आणि विद्यतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी एमएसइबी’च्या ओव्हरहेड वायर सुद्धा त्यासाठी भूमिगत करण्यात आल्या आहेत. तसेच त्यासंबंधित पोलशिफ्टिंग सुद्धा करण्यात आली आहे. रशियन बनावटीच्या मिग लढाऊ विमानांच्या प्रतिकृती पुढील महिन्यात हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड’कडून अधिकृतपणे प्राप्त होतील आणि त्यानंतर काम पूर्ण झाल्याची घोषणा करून भाजप’कडून ‘स्मार्ट’ उदघाटन सोहळा केला जाईल.

मुकणे पाणीपुरवठा योजना, ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क, कालिदास कलामंदिर नाट्यगृह नूतनीकरण, होळकर पुलावरील फाउंटन, स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे इतिहास वस्तुसंग्रहालय, उड्डाणपुलाखालील सुशोभीकरण, बोटॅनिकल गार्डन, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प असे अनेक प्रकल्प मनसेच्या सत्ताकाळात जन्माला आलेले प्रकल्प स्वतःचे असल्याची ‘स्मार्ट’ बोंब याआधीच भाजपने केली आहे. त्यामुळे आता नाशिकर किती स्मार्ट आहेत ते सुद्धा अनुभवण्याची वेळ पुन्हा आली आहे.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x