26 November 2022 8:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Weekly Horoscope | 28 नोव्हेंबर - 4 डिसेंबर | 12 राशीच्या लोकांसाठी कसा राहील आगामी आठवडा, नशीबाची साथ कोणाला? Tata Mutual Fund | टाटा म्युच्युअल फंडमधील टॉप 10 स्किमची लिस्ट सेव्ह करा, 3 वर्षात पैसे दुप्पट करा आणि मालामाल व्हा Horoscope Today | 27 नोव्हेंबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Numerology Horoscope | 27 नोव्हेंबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Bhediya Box Office Collection | बॉक्स ऑफिसवर 'भेडिया'ची दमदार ओपनिंग, 1 दिवसात किती कोटींचा गल्ला? Paytm Share Price | खरं की काय? पेटीएमचा स्टॉक पुन्हा दुपटीने वाढणार? तज्ज्ञ असं सांगत असण्यामागे नेमकं कारण काय? Vikram Gokhale | मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी तसंच नाट्यसृष्टीतही अढळपद निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंच निधन
x

राज ठाकरे म्हणाले होते निवडणुकीआधी असं काहीतरी घडेल - शरद पवार

National congress party, maharashtra navninrman sena, mns, ncp, raj thackeray, sharad pawar, narendra modi, bjp

२४ फेब्रुवारी रोजी “महाहिट २४ मराठी” या नवीन वृत्तवाहिनीच्या उदघाटन समारंभाला राज ठाकरे उपस्थित होते. कोल्हापूर येथे झालेल्या या वाहिनीच्या उदघाटन समारंभात राज ठाकरेंनी उपस्थितांना संबोधित करताना सध्याचं सरकार काय गैरप्रकार करत आहे याची उजळणी करून दिली. आणि या बातमीचा दाखला देत पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले “राज ठाकरे म्हणाले होते निवडणुकीआधी असं काहीतरी घडेल” आणि आता तसंच काहीसं घडलं आहे म्हणून त्यांनी केलेलं भाकित गंभीरतेने घ्यायला हवं.

शरद पवार हे राजकारणातील जुने जाणते नेते असून त्यांनी केलेल्या या भाष्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजप या सगळ्या गोष्टींचा राजकीय फायदा घेत असून, पुलवामा हल्ल्यानंतर सुद्धा मोदी आणि भाजप पक्षसंघटनेच्या बैठकांमध्ये व्यस्त होते. ते या हल्ल्याचा राजकीय फायदा घेत आहेत असे बऱ्याच जाणकारांचे मत आहे.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

भाजप सरकार हे अपयशी सरकार आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्याकडे लोकांना सांगण्यासाठी काहीच नसून केवळ लोकांमध्ये देशभक्तीची लहर निर्माण करायची आणि त्यातून लोक आपोआप मागचं सगळं विसरून जातील. आणि त्यासाठी हे कदाचित १ लहानसं युद्ध देखील घडवून आणतील असं भाकीत राज ठाकरेंनी २४ फेब्रुवारी रोजी कोल्हापुरात केलं होतं.

तसेच जर भारतीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची चौकशी केली तर सगळं काही उघड होईल आणि भाजपचं पितळ देखील उघड होईल. पुलवामा हल्ल्यानंतर इतर सर्व पक्ष भारत सरकारच्या मागे पूर्ण ताकतीने उभे राहिले आणि आपण देशासाठी १ आहोत असे जाहीर केले. परंतु या सभेला मात्र मोदीच अनुपस्थित होते, त्यावेळी ते उदघाटन, समारंभ आणि पक्ष बांधणीच्या कामात व्यस्त होते.

पुढे राज ठाकरे असे म्हणतात पुलवामा हल्ल्यातील जवान हे राजकीय बळी ठरले. तसेच निवडणुकीपूर्वी अशीच कुठची तरी घटना घडवली जाईल आणि तुमच्या सगळ्यांचं लक्ष हे त्या गोष्टीकडे केंद्रित होईल. या सगळ्या गोष्टींमुळे लोक मागच्या साडेचार वर्षात झालेला भ्रष्टाचार विसरून जातील आणि इतर सगळे मुद्दे जसे कि विजय मल्ल्या, निरव मोदी, मेहुल चोक्सी, राफेल घोटाळा हे बाजूला राहतील. हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान असे १ चित्र उभे करायचे आणि लोकांना मूर्ख बनवायचे असं काहीसं पुढील काही दिवसात घडणार आहे हे भाकीत राज ठाकरेंनी केलं होतं.

सविस्तर व्हिडीओ:

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x