20 May 2022 8:30 AM
अँप डाउनलोड

मराठा आरक्षणातील आंदोलकांवरील गुन्हे देखील सरकारने मागे घ्यावे: आ. धनंजय मुंडे

Maratha Reservation, Ek Maratha lakh Maratha, NCP, MLA Dhananjay Munde

मुंबई: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारताच मेट्रोच्या आरेमधील कारशेडला स्थगिती दिली होती. यानंतर आंदोलकांवरील गुन्हेही रद्द केले होते. तसेच भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी नाणार आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेण्याची मागणी केली होती. यावर ठाकरेंनी सकारात्मक पाऊल उचलले होते. आता राष्ट्रवादीच्या विधानपरिषद आमदारांनंतर धनंजय मुंडेंनीही मुख्यमंत्र्यांना पत्र (NCP MLA Dhananjay Munde wrote a letter to Chief Minister Uddhav Thackeray) लिहीत भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे (Bhima Koregaon Riots).

दरम्यान, भीमा कोरेगाव व इंदू मिल आंदोलनातील (Indu Mill and Bhima Koregaon) आंबेडकरी कार्यकर्ते व युवकांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आज दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील, पक्षाचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते.

दरम्यान आता मराठा आदोलकांवरील गुन्ह्यांच काय असा प्रश्न उपस्थित होत होता. आता हे गुन्हेही मागे घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे. त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तशी अधिकृत मागणी केली आहे.

हॅशटॅग्स

#Dhananjay Mundey(51)#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x